माहीममध्ये पोलिसांचीच घरे चोरांनी फोडली, १३ घरात दरोडा

माहीममध्ये पोलिसांचीच घरे चोरांनी फोडली, १३ घरात दरोडा

माहीम पोलीस कॉलनीतील एकाच वेळी तेरा पोलिसांच्या घरात घरफोडी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री पोलिसांच्या घरांचा कडी-कोयंडा तोडणारा चोर सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याला लवकरच बेड्या ठोकण्यात येतील असे माहीम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर शिरसाठ यांनी सांगितले आहे.

मध्य रात्री दबक्या पावलाने माहीम पोलीस वसाहतीत येत पोलिसांची घर बंद असल्याची खात्री करून ही घरफोडी करण्यात आली आहे.पोलिसांच्या घरातून रोकड आणि मौल्यवान वस्तूंची तसेच देवाच्या चांदीच्या मूर्तीची चोरीस गेल्या आहेत. पोलिसांच्या घरांसह प्ले ग्रुप, नर्सरी आणि वसाहतीच्या कार्यालयाला देखील चोराने लक्ष्य केले आहे. रात्रपाळीवर असलेले पोलीस, सुट्टीनिमित्त गावी गेलेल्या पोलिसांची घर तसेच निवृत्त पोलिसांच्या बंद घरांना देखील चोरट्याने लक्ष्य केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 331 (4), 324 (4 ) आणि ३०५ अन्वये अज्ञातविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

टेक्सासमध्ये भगवान हनुमानाची ९० फूट उंची मूर्ती स्थापन !

बदलापुरातील हरामखोर नराधमाला फाशीच होणार…!

बदलापूरप्रकरणात राजकारण करू नका

कासीम पठाणच्या छळास कंटाळून तरुणीची आत्महत्या

याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार राजाराम भिकू मोहिते यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री दहा वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजल्याच्या दरम्यान माहीम पोलीस वसाहतीत तेरा घरांमध्ये रूमचे कडी कोयडे तोडून आत मध्ये प्रवेश करून अज्ञात चोरट्याने १३ हजार रु. किमतीची मालमत्ता चोरून नेली आहे. तक्रारदार राजाराम मोहिते हे पाणी सोडण्याचे काम करत असून पाण्याच्या टाक्या भरल्या आहेत किंवा कसे याची पाहणी करून घरी परतत असताना त्यांना आपल्या वसाहतीत चोरी झाली आहे, अशी माहिती मिळाली. त्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता रात्रपाळीसाठी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसाच्या करा तसेच रजेवर गेलेल्या पोलिसांच्या घरात चोरट्याने डल्ला मारला असल्याचे दिसून आले. चोरट्याने देवघरातील चांदीच्या आणि सोन्याच्या वस्तू लंपास केल्या असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Exit mobile version