…आणि तिच्या अंगावरील दागिन्यांचा झाला दगड

…आणि तिच्या अंगावरील दागिन्यांचा झाला दगड

पैशाच्या मोहाखातर एका महिलेला आपल्या दागिन्यांवर पाणी सोडावे लागले होते. नुकतीच अशी घटना दादरमध्ये घडली. माणसाला अतिलोभ हा भारी पडतो हेच या घटनेतून सिद्ध झालेले आहे.

दादरमधील एक महिला पैशाच्या लोभाला बळी पडली आणि अंगावरील जवळपास ९६ हजारांचे दागिने गमावून बसली. संबंधित महिलेला ठगांनी बोलण्यात गुंगवून तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले आणि तिच्या हाती चक्क दगड टेकवला.

घडलेल्या घटनेनुसार दादरमधील ही महिला माझगाव येथे राहण्यास आहे. फुलांच्या खरेदीसाठी ही महिला दादरमध्ये आलेली. खरेदी झाल्यानंतर महिलेने घरी जाण्यासाठी मोर्चा वळवला. परेल एसटी बस डेपोमध्ये बसची वाट पाहात असताना ५० वर्षांचा एक इसम महिलेला धडकला. त्यासोबत एक तरुणही होता. संबंधित महिलेला त्यांनी अंबरनाथला कोणती बस जाते याबद्दल विचारणा केली. महिलेने बसने जाण्यापेक्षा ट्रेनने जा असा सल्ला दिला.

या दोन पुरुषांमध्ये अचानक भांडणे लागली. या भांडणाचा मुद्दा होता तो म्हणजे चोरी. मुलाने पन्नाशीच्या इसमास मालकाने कामावरून काढून टाकल्याचे सांगितले. कामावरून काढून टाकल्याच्या रागात मुलाने तिथून वस्तू चोरी केली असे त्या पन्नाशीच्या इसमास सांगितले. या चोरीतून दोन ते तीन लाखांची रोकड असल्याचे त्या महिलेस या दोघांनी सांगितले.

त्या पुरुषाने मुलाला दोन-तीन हजार देऊन हे दोन तीन लाख आपल्याकडे ठेवू असे महिलेला सांगितले. तसे करून मुलाला ते दोन-तीन लाखाचे पाकीट देण्यास सांगितले. पण आपल्याला ५० हजार मिळाले तर पाकीट देतो असे तो मुलगा म्हणाला. तेव्हा महिलेचे आणि स्वतःचे दागिने काढून ठेवत त्याने मुलाला पाकीट देण्यास सांगितले.

हे ही वाचा:

खिळखिळ्या इमारतींबरोबर सेवाशुल्कामुळे म्हाडाचे रहिवाशीही जर्जर

मॉल बाहेरूनच बघणाऱ्यांची संख्या वाढली

सदैव अटल: श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींचे पुण्यस्मरण

शेवटी अनधिकृत बांधकामांवर म्हाडाचा हातोडा

महिलेला बोलण्यात गुंगवून या दोघांनी तिच्या अंगावरचे दागिने काढण्यास सांगितले. बोलण्याच्या नादात या महिलेने अंगावरील दागिने काढून एका रुमालात बांधले. तो रुमाल महिलेच्या हातात या दोघांनीही दिला. शिवाय तिला काही पैसे देतो असेही म्हणाले, परंतु काहीच हाती लागले नाही. पुढे जाताच महिलेला त्या दागिन्याऐवजी हाती दगड लागल्याचे समजले. एकूणच काय तर थोड्या पैशाच्या मोहापायी महिलेने लाख रुपये गमावले.

Exit mobile version