मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई करत तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. मुंबई विमानतळावरून कोट्यावधींचे हिरे आणि सोने जप्त करण्यात आले आहे. मुंबई विमानतळावरून बँकॉकला हिरे घेऊन जाणाऱ्या प्रवाशाला मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. यात दोन कोटींचे हिरे आणि सहा कोटींचे सोने जप्त करण्यात आले आहे.
मुंबई विमानतळावरुन हिऱ्यांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यामुळे सर्वांची कसून चौकशी सुरु होती. अशातच एका व्यक्तीची तपासणी केली असता नुडल्सच्या पाकिटांमध्ये हिरे सापडले. त्या हिऱ्यांची किंमत २ कोटी २ लाख रुपये आहे. हा व्यक्ती मुंबईवरुन बँकॉकला जात होता, अशी माहिती आहे.
हे ही वाचा:
‘काँग्रेस की लूट जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही
“नरेंद्र मोदींमुळेचं पाकिस्तान शांत बसलाय”
शाहजहान शेखचा पूर्वीचा अहंकार गायब; पोलीस गाडीत बसून ढाळतोय अश्रू
मुंबई विमानतळावर श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबो येथून मुंबईत दाखल झालेल्या एका प्रवाशाची सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यावेळी त्याच्या अंतर्वस्त्रात ३२१ ग्रॅम सोने लपविल्याचे आढळले. तसेच अबुधाबी, दुबई, बहरिन, रियाध, मस्कत, बँकॉक आणि सिंगापूर येथून मुंबईत दाखल झालेल्या दहा प्रवाशांकडे एकूण ६ किलो १९९ ग्रॅम सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ४ कोटी ४ लाखांचे सोने आणि २ कोटी २ लाखांचे हिरे असा एकूण ६ कोटी ६ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे.