उत्तराखंडच्या हल्द्वानी परिसरातील अवैध मदरसा जमीनदोस्त केल्यानंतर संतापलेल्या जमावाने पोलिस प्रशासनावर दगडफेक करून गाड्या पेटवून दिल्या. यात काही पोलिसही जखमी झाले आहेत. त्यात काही महिला पोलिसांचाही समावेश आहे. त्यांना जबर जखमा झाल्या आहेत. उपचारासाठी रुग्णालयात पोहोचल्यानंतर महिला पोलिसांनी त्यांच्यावर गुदरलेला प्रसंग कथन केला.
‘दगडफेकीला सुरुवात झाल्यानंतर आम्ही १५-२० जण एका घरात घुसलो. त्यानंतर बाहेरून काही जणांनी घराला आग लावण्याचा प्रयत्न केला आणि दगडफेक केली. आम्ही मोठ्या कठीण परिस्थितीत स्वतःचा जीव वाचवून आलो आहोत. त्यानंतर घटनास्थळी पोलिस दल आले. प्रत्येक गल्ली, घरातून दगडफेक होत होती.
हे ही वाचा:
‘आर्टिकल ३७०’ हटविल्याचा थरार लवकरच मोठ्या पडद्यावर!
भारत-म्यानमार देशाचा ‘फ्री मूव्हमेंट रेजिम’ करार अखेर रद्द!
चकमकफेम प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा
उत्तराखंड: हल्द्वानीमध्ये ‘बेकायदेशीर’ मदरसा पाडल्यानंतर दगडफेक, वाहने पेटवली!
आम्ही एका घरात घुसून पोलिसांना नेमके ठिकाण कळवले. ज्या घरात आम्ही होतो, ज्या व्यक्तीने आमचा जीव वाचवला, त्यांच्या घराचे दरवाजे तोडण्यात आले, काचा फोडण्यात आल्या,’ असे या महिला पोलिसाने सांगितले.