भाजपा, आरएसएसच्या सभांमध्ये ग्रेनेड फेकण्या होता कट, तीन दहशतवाद्यांना अटक

तेलंगणा पोलिसांना मोठे यश मिळाले असून रविवार, २ ऑक्टोबर रोजी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात यश आले आहे.

भाजपा, आरएसएसच्या सभांमध्ये ग्रेनेड फेकण्या होता कट, तीन दहशतवाद्यांना अटक

तेलंगणा पोलिसांना मोठे यश मिळाले असून रविवार, २ ऑक्टोबर रोजी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात यश आले आहे. हे तीनही जण हैदराबादचे रहिवासी असल्याची माहिती आहे. हे दहशतवादी दसऱ्यानिमित्त शहरात काढण्यात येणाऱ्या मिरवणुका आणि इतर ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार होते. तसेच हे दहशतवादी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयं संघाच्या (आरएसएस) सभांमध्ये ग्रेनेड फेकण्याच्या तयारीत होते.

मोहम्मद अब्दुल जाहिद उर्फ ​​मोटू, मलकपेट येथील मोहम्मद समीउद्दीन आणि हुमायून नगर येथील रहिवासी मज हसन फारुख अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. या तीन दहशतवाद्यांना जुने हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चार हातबॉम्ब, काही रुपये रोख आणि इतर आक्षेपार्ह वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत.

संघ आणि भाजपच्या नेत्यांना लक्ष्य करण्याचा दहशतवादी कट रचत असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. तीन दहशतवाद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात दहशत पसरवणे आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा त्यांचा डाव असल्याचे दहशतवाद्यांनी चौकशीदरम्यान सांगितले.

हे ही वाचा:

टेकूच्या शोधात शिल्लक सेना…

अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर, भाजपाकडून मुरजी पटेल रिंगणात

भारतीय हवाई दलाला मिळाली स्वदेशी ‘प्रचंड’ ताकद

दुर्गापूजा मंडपात आग लागून ५२ जण जखमी, तीन जणांचा मृत्यू

एफआयआरमध्ये पोलिसांनी इतर चार संशयित आरोपींचाही उल्लेख केला आहे. यात आदिल अफरोज, अब्दुल हादी, सोहेल कुरेशी आणि अब्दुल कलीम यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. चौकशीदरम्यान, मुख्य सूत्रधार जाहिदने सांगितले की तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होता. याशिवाय हैदराबादमध्ये दहशतवादाचा कट रचणारा फरहतुल्ला घौरी हा सिद्दीकी बिन उस्मान आणि अब्दुल मजीद यांच्या संपर्कात होता. हे सर्वजण सध्या फरार आहेत.

Exit mobile version