मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कोठडीत असलेले नवाब मलिकांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बुधवारी ईडीने नवाब मलिक यांना न्यायालयात हजर केले होते. नवाब मलिकांच्या निर्दोषतेचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण मलिक हे दाऊद इब्राहिमच्या बहिणीशी व्यवहार करत होते, असा युक्तिवाद ईडीने न्यायालयात केला आहे.
न्यायालयीन कोठडीत असलेले मलिक मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत. तब्येत बिघडत असल्याचा दावा करत मलिकांनी अनेकवेळा जामीन मागितला आहे. मात्र, न्यायालयाने यापूर्वी वैद्यकीय कारणास्तव त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यांच्या नियमित जामीन अर्जावर विशेष न्यायाधीशांसमोर सुनावणी सुरू आहे.
सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंग ईडीच्यावतीने न्यायालयात युक्तिवाद करत आहेत. त्यांनी ईडीच्या वतीने मलिकांचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली आहे. यावेळी बुधवारी न्यायालयात युक्तिवाद करताना सिंग म्हणाले, नवाब मलिक यांना जामीन मिळणे किंवा त्यांच्या निर्दोषतेचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण मलिकांनी १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी आणि जागतिक दहशतवादी घोषित केलेल्या दाऊद इब्राहिमचा बहिणीशी व्यवहार केला आहे.
हे ही वाचा:
सर विश्वेश्वरय्यांनी अचानक रेल्वेची साखळी खेचली आणि सगळ्यांनाच धक्का बसला
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोलिस निरीक्षकाने केली होती विकृत पोस्ट
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात ‘या’ सेवा मिळणार मोफत
गाेव्यामध्ये काॅंग्रेसचे आठ आमदार ‘पदयात्रा’ करत भाजपात
सध्या न्यायालयीन कोठडीत तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांना ईडीने २३ फेब्रुवारी रोजी मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींखाली अटक केली होती. मलिकांचे दाऊद इब्राहिमशी थेट संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर ईडीने केला आहे.