मुंबई लोकल मधील गर्दीचा फायदा घेत, प्रवाशांच्या मोबाईल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. या संदर्भात मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची गस्ती वाढवण्यात आलेली आहे.
त्याच बरोबर मोबाईल चोरांचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे शोध घेतला असता, वडाळा रेल्वे पोलिसांनी दोन चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित आरोपींवर पोलिंसानी गुन्हा दाखल केल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
हार्बर मार्गावरील गोवंडी स्थानकातून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलने तक्रारदार मोहम्मद खान प्रवास करीत असताना, स्थानकात उतरल्या नंतर आपला मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्या संदर्भात २६ जुलै रोजी १० हजार रुपयांचा मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली. गस्त घालणाऱ्या पोलिसांनी संशयित तरुणाला रे रोड स्थानकात पकडले. त्या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे मोबाईल सापडले. चौकशीअंती आरोपीने चोरीच्या मोबाईलची कबुली दिली. त्यानंतर शाहबाझ सय्यदला (१९) पोलिसांनी अटक केली.
हे ही वाचा:
ज्या दिवशी माझी मुलाखत घेतली जाईल तेव्हा भूकंप होईल!
रेल्वेने प्रवाशांना परत केले ‘इतके’ मौल्यवान सामान
पाहा, उपमुख्य अभियंता काय करतोय? अमित साटम यांचे पत्र
पानाच्या दुकानात काम करणाऱ्या सांगलीच्या संकेत सरगरने मिळविले रौप्य
हार्बर मार्गावरील सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून तक्रारदार अक्षयकुमार २६ जुलै रोजी प्रवास करत होते. किंग्स सर्कल स्थानक येण्यापूर्वीच चोरांनी हाताला झटका देवून मोबाईल घेऊन पळ काढण्याच्या तयारीत असताना, कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलिसांनी चोराला पकडले. पोलिसांनी आरोपी अस्लम शेख (३२) याला १३ हजार रुपये किमतीचा मोबाईल ताब्यात घेऊन त्याला अटक केली.