29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरक्राईमनामागेल्या वर्षी मुंबईत मॅनहोलची झाकणे पळवण्याचा विक्रम

गेल्या वर्षी मुंबईत मॅनहोलची झाकणे पळवण्याचा विक्रम

दोन वर्षांत या झाकणांच्या चोरीमध्ये ८२.५ टक्के वाढ

Google News Follow

Related

सन २०२०मध्ये करोना साथीच्या कालावधीत मुंबईतील ४५८ मॅनहोलच्या झाकणांची चोरी झाली होती. त्यानंतर ही संख्या वाढतच चालली आहे. दोन वर्षांत या झाकणांच्या चोरीमध्ये ८२.५ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी, २०२२मध्ये तब्बल ८३६ मॅनहोलच्या झाकणांची चोरी झाली आहे.

या वर्षीच्या पहिल्या पाच महिन्यांच्या मॅनहोल झाकणांच्या चोऱ्यांची सरासरी काढल्यास वर्षभरात ही संख्या सन २०२१पेक्षा अधिक होऊ शकते. सन २०२३मध्ये मे महिन्यापर्यंत ३३२ मॅनहोलची झाकणे चोरीला गेली आहेत. झाकणांविना मॅनहोल हे मानवाच्या जीवितासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. विशेषत: पूरपरिस्थिती आल्यास या झाकणांअभावी माणूस यात पडून त्याचा जीव जाऊ शकतो. ऑगस्ट २०१७मध्ये मुसळधार पाऊस पडल्याने पाणी साचून प्रख्यात गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर यांचा एलफिन्स्टन रोडजवळ उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता.

हे ही वाचा:

महाराष्ट्र उबाठाला थेट विचारतोय… म्हणत आशिष शेलारांचे ठाकरेंना सवाल

‘कॅस्ट्रोफिक इम्पोशन’मुळे पाणबुडीचा अपघात

मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट करणार, मुंबई पोलिसांना धमकी

अग्रलेखाची उंची आणि वैचारिक खुजेपणा

सन २०२२मध्ये सर्वाधिक मॅनहोलची झाकणे ही महापालिकेचा डी वॉर्ड (ताडदेव, मलबार हिल), के पश्चिम (अंधेरी), के पूर्व (जोगेश्वरी, विलेपार्ले) या भागांमधून चोरीला गेली आहेत. उच्चभ्रूंची वस्ती असणाऱ्या या भागांना लक्ष्य केले जाणे, यात आश्चर्याची बाब नसल्याचे अधिकारी सांगतात. ‘उंच इमारतींमध्ये राहणारे हे उच्चभ्रू नागरिक अशाप्रकारे मॅनहोलची झाकणांची चोरी होत असताना याकडे फारसे लक्ष देत नाहीत. त्यामुळे या भागांना चोर लक्ष्य करतात,’ असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

‘मॅनहोलची झाकणे कास्ट आर्यन या धातूची बनलेली असतात. त्यामुळ भंगार बाजारात या धातूला चांगली किंमत मिळते. अशा प्रकारे झाकणे चोरीला गेल्यावर पालिकेच्या प्रभागाचे अधिकारी तातडीने स्थानिक पोलिस ठाण्याला याबाबत कळवतात. तसेच, लवकरात लवकर या मॅनहोलवर नवीन झाकण बसवण्याची हालचाल केली जाते. मात्र अनेकदा त्याच आकाराचे मॅनहोलचे झाकण सापडत नाही,’ अशी माहिती पालिका अधिकाऱ्याने दिली.

अशाप्रकारे मॅनहोलची झाकणे चोरी होऊ नयेत, यासाठी मुंबई महापालिकेने कार्यादेश जाहीर केले आहेत. त्यानुसार, प्रायोगिक तत्त्वावर शहरभरातील १४ मॅनहोलच्या झाकणांवर अलार्म बसवले जाणार आहेत. ही झाकणे जबरदस्तीने हटवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा अलार्म मलनि:सारण यंत्रणेच्या नियंत्रण कक्षाकडे जाईल. त्यामुळे होणारी चोरी रोखता येईल, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

मॅनहोलच्या झाकणांची चोरी

२०२०  ४५८

२०२१ ५६४

२०२२ ८३६

२०२३ ३३२ (मेपर्यंत)

सन २०२२मधील सर्वाधिक चोऱ्या

के पश्चिम (अंधेरी पश्चिम ) ९५

के पूर्व (जोगेश्वरी, विलेपार्ले) ७१

डी वॉर्ड (मलबार हिल, ताडदेव ) १०८

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा