अडीच कोटींच्या हस्तिदंताची चोरी

ठाणे पोलिसांच्या क्राईम युनिट-1 ने कळवा परिसरातून सुमारे १.४ किलो वजनाचे हस्तिदंत जप्त केले.

अडीच कोटींच्या हस्तिदंताची चोरी

ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी सुमारे अडीच कोटी रुपयांचे हस्तिदंत जप्त केले आहेत. तसेच हस्तिदंताच्या तस्करीप्रकरणी दोघांना अटक देखील करण्यात आली आहे.

ठाणे पोलिसांच्या क्राईम युनिट-1 ने कळवा परिसरातून सुमारे १.४ किलो वजनाचे हस्तिदंत जप्त केले. कळव्यातील शिवाजी पार्कमध्ये हस्तिदंत विकण्यासाठी काही लोक येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्याआधारे पोलीस पथकाने सापळा रचून दोघांना पकडले असून त्यांच्याकडून एक बॅग जप्त करण्यात आली आहे. अमित वरळीकर आणि सागर पाटील अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अमित हा फिटनेस ट्रेनर आहे तर सागर पाटील लॉटरी तिकीट विक्रेता म्हणून काम करतो. तपासादरम्यान, पिशवीत ३४.५० सेमी लांब आणि आठ सेमी रुंद हस्तिदंताचा तुकडा सापडला. हस्तिदंताची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

या हस्तिदंतावर एका महिलेची प्रतिमा आणि काही कलाकृती कोरण्यात आल्या आहेत. खालच्या भागात, इंग्रजी अक्षरे आणि काही संख्यांव्यतिरिक्त, काही परदेशी भाषा लाल रंगात लिहिलेली आहेत. कोरलेल्या या कलाकृतीची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा:

रोहिंग्यांना फ्लॅट देण्याच्या निर्णयावर नरेंद्र मोदींची फुली

मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून जॅकलिन फर्नांडिसचे नाव

निवडणूक समितीतून गडकरी गेले, फडणवीस आले!

भाजपावर टीका करण्यासाठी केजरीवाल यांनी अभिनेत्याला दिली ‘सुपारी’

दोन्ही आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या विविध कलमांतर्गत कळवा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी पोलिसांना सांगितले की, त्यांनी हे हस्तिदंत तारा नावाच्या व्यक्तीकडून विकत घेतले होते, त्यानंतर त्या व्यक्तीला पकडण्यासाठी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

Exit mobile version