पुण्यातून ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिटच चोरले

पोलिसांकडून तपास सुरू

पुण्यातून ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिटच चोरले

पुण्यातून ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल युनिटची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून हे युनिट चोरीला गेले आहे. सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्रॉंगरूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहेत.

वृत्तानुसार, दोन दिवस शनिवार आणि रविवार तहसील कार्यालयाला सुट्टी होती. त्यामुळे सोमवारी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयातील अधिकारी कार्यालयात येता त्यांना स्ट्राँग रूमचे कुलूप तोडण्यात आल्याचं आढळून आलं. त्यानंतर या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीन मधून एक ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली आणि यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

हे ही वाचा:

‘कब्रस्तान नव्हे, हे महाभारतकालीन लाक्षागृह’

औरंगजेबाने तोडले होते कृष्णजन्मभूमी मंदिर!

अमेरिकेत भारतीय स्थलांतरितांसाठी ग्रीन कार्डचा मार्ग खुला होणार

मुस्लिम धर्मगुरु अटक प्रकरणी शंभरपेक्षा जास्त जणांविरुद्ध गुन्हा

ही चोरी करताना ते चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. ईव्हीएम चोरीला गेल्याचे समजताच सासवड पोलीस ठाण्याचे कर्मचारी, फिंगरप्रिंट एक्सपर्टचे पथक, एलसीबीचे पथक या ठिकाणी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.

Exit mobile version