झारखंडची राजधानी रांचीमध्ये पुन्हा एकदा वातावरण बिघडवण्याचा कट रचण्यात आला आहे.राजधानीच्या बरियातू पोलीस स्टेशन हद्दीतील हाऊसिंग कॉलनी चौकाजवळील श्री राम जानकी मंदिरात बसवण्यात आलेल्या मुर्त्यांची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. एवढेच नाहीतर मंदिरातील देवतांच्या डोक्यावरील चांदीचा मुकुट, सोन्याचे दागिने यासह पूजेमध्ये ठेवलेले साहित्य घेऊन आरोपी फरार झाले आहेत.दरम्यान, मंदिरातील दानपेटी सुरक्षित राहिली आहे.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि हिंदू संघटनांनी हौसिंग कॉलनी चौकाजवळ रास्ता रोको करून निषेध केला.या घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको केल्याने बरियातू-बुटी रस्त्यावर पाच तास वाहनांची वाहतूक बंद राहिली.त्यामुळे वाहनांच्या लांबच-लांब रांगा होत्या.मूर्तीची विटंबना करण्याऱ्या आरोपींना अटक करून मंदिरात नवीन मूर्ती बसवण्याची मागणी आंदोलक करत होते.
हे ही वाचा:
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टांगती तलवार
उच्च न्यायालय डॉक्टरांना म्हणाले, प्रिस्क्रिप्शन कळेल अशा अक्षरात लिहा!
‘कत्ल की रात’ : इम्रान खान यांनी मध्यरात्री केलेला फोन मोदी नाकारतात तेव्हा…
‘ईजमायट्रिप’ने स्थगित केल्या मालदिवच्या सर्व विमानाचे बुकिंग!
या प्रकरणाची माहिती मिळताच रांचीचे खासदार संजय शेठ,आमदार सीपी सिंह,समरी लाल,आरएसएस,विहिंप,बजरंग दल, हिंदू जागरण मंचचे अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.या घटनेची माहिती मिळताच शहर एसपी राजकुमार मेहता स्वतः घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आपल्या पगारातून मंदिरात मूर्ती बसवण्याचे आश्वासन संतप्त लोकांना दिले.माझी श्रद्धा असल्याने मी मंदिरात मूर्ती देणार आहे असे त्यांनी सांगितले.तसेच याप्रकरणी एसआयटी नेमण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.यानंतर लोक रस्त्यावरून दूर गेले आणि या मार्गावरील वाहनांची वाहतूक सुरळीत झाली.
त्यानंतर श्री राम जानकी मंदिरभोवती पाळत ठेवण्यासाठी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले.एसपी राजकुमार मेहता यांनी सांगितले की, सीसीटीव्ही तपासले असता पहाटे तीन वाजता एक व्यक्ती खांद्यावर बॅग घेऊन मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा उचलताना दिसत आहे.याप्रकरणी पोलिसांकडून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.दरम्यान, प्रशासनाने न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.