पुण्यात कोयत्याची दहशत; वाद झाला आणि तरुणाने थेट कॉलेजमध्येच कोयता नेला

पोलिसांकडून तरुणाला अटक

पुण्यात कोयत्याची दहशत; वाद झाला आणि तरुणाने थेट कॉलेजमध्येच कोयता नेला

पुण्यात कोयता वापरून दहशत निर्माण करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून एका तरुणाने थेट कॉलेजमध्येच कोयता नेल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या घटनेची तातडीने दखल घेत तरुणाला अटक केली आहे. तसेच अशा घटनांना चाप बसावा आणि तरूणाला अद्दल घडवावी यासाठी आरोपीची कॉलेजमध्ये धिंड काढण्यात आली. कुणाल कानगुडे (वय १९ वर्षे) असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आबासाहेब गरवारे महाविद्यालयात कुणालचा डॅनी या तरुणाशी काही कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर कॉलेजमध्ये दहशत राहावी तसेच वादाच्या कारणामुळे कुणाल याने थेट कॉलेजमध्ये कोयता काढून दहशत माजवली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कॉलेजमधील सीसीटीव्ही तपासून त्याला अटक करून डेक्कन परिसरातून त्याची धिंड काढली. 

दरम्यान, पुण्यात कोयत्याचा धाक दाखवून गुन्हेगारी फोफावताना दिसत आहे. अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालकांकडून देखील आता चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील अनेक परिसरात कोयता घेऊन काही गट दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा टोळक्यांना शोधून कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

फ्रान्समध्ये आंदोलकांकडून ऍपल, नायकीच्या दुकानांची लूट

अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टरांच्या मुलाचा २२ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

अमेरिकेतील शाळांमध्ये लवकरच मिळणार ‘हिंदी’चे धडे

समृद्धी एक्स्प्रेसवे अपघात टायर फाटल्यामुळे नाही तर चालकाच्या डुलकीमुळे?

काही दिवसांपूर्वी पुण्यात एका तरुणीवर कोयत्याने तरुणाने हल्ला केला होता. एकतर्फी प्रेमातून या तरुणानं तरुणीवर हल्ला केल्याची माहिती समोर आली होती. या हल्ल्यातून तरुणी थोडक्यात बचावली मात्र, कोयत्याच्या दहशत पुन्हा एकदा चर्चेत आली.

Exit mobile version