ट्रकला आरटीओने महामार्गावर थांबवल्याचा व्हिडीओ समोर; दोन अधिकारी अटकेत

अपघातात १२ जणांचा मृत्यू

ट्रकला आरटीओने महामार्गावर थांबवल्याचा व्हिडीओ समोर; दोन अधिकारी अटकेत

शनिवारी रात्री समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला होता. नाशिकहून बुलढाण्याच्या सैलानी बाबाच्या दर्शनाला गेलेल्या पर्यटकांच्या बसचा ट्रकला धडकून मृत्यू झाला. महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकला अचानक आरटीओ अधिकाऱ्यांनी थांबवल्यामुळे मागून येणाऱ्या बसने ट्रकला जोरदार धडक दिल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर या प्रकरणी महामार्गावर ट्रक आरटीओ अधिकाऱ्यांनी थांबविला असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

हायवेवर गाडी थांबवणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. प्रदीप राठोड, नितीनकुमार गणोरकर असे निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे असून दोघेही आरटीओ असिस्टंट इन्पेक्टर आहेत.

समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरमधील जांबरगाव टोलनाक्याजवळ ट्रक आणि टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात झाला. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावर आरटीओने अवैधरीत्या थांबवलेल्या ट्रकला ट्रॅव्हलरच्या धडकेने अपघात झाला आहे. आरटीओने हायवेवर अपघातग्रस्त ट्रकला थांबवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओनंतर समृद्धी महामार्गावरील अपघात आरटीओ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे झाल्याचे स्पष्ट आले आहे.

हे ही वाचा:

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा नुखबा फोर्सचा सर्वोच्च कमांडर ठार!

भवानी शक्तीपीठ हे संस्कारांचे उर्जा केंद्र

गोलंदाज एल. शिवरामकृष्णनने केले राजदीपला त्रिफळाचीत!

पॅलेस्टाइनवरून तस्लिमा नसरिन यांनी बांगलादेशवासियांना सुनावले

समृद्धी महामार्गावरील अपघातातील जखमींनी दिलेल्या माहितीनुसार, आरटीओची गाडी ट्रकचा पाठलाग करत होती. टोलनाक्यापासून काही अंतर पुढे गेल्यावर आरटीओने ट्रकला थांबवले. ट्रक महामार्गाच्याकडेला उभा राहिला पण त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगानं आलेल्या टेम्पो ट्रॅव्हरलरची ट्रकला जोरदार धडक बसली. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर, जखमींवरही सरकारी खर्चातून उपचार करण्यात येणार आहेत.

Exit mobile version