ट्रक चालकाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्याच्या अंगावर चढवला ट्रक

व्यापाऱ्याचा मृत्यू हत्येचा गुन्हा दाखल

ट्रक चालकाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्याच्या अंगावर चढवला ट्रक

ट्रक चालकाने एका मोटार चालकाच्या अंगावर ट्रक चढवून त्याची हत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री मुलुंड पूर्व आनंद नगर टोल नाका येथे घडली. याप्रकरणी नवघर पोलिसांनी ट्रक चालकावर हत्याचा गुन्हा दाखल केला असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.

नूर मोहम्मद अली असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव असून तो उत्तर प्रदेश राज्यातील राहणारा आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे राहणारे भांड्याचे व्यापारी मनीष सोनी (३६) हे त्यांचा पुतण्या भावेश सोनी यांच्यासोबत गुरुवारी रात्री मुंबई येथून ठाण्याच्या दिशेने स्विफ्ट मोटारीने जात होते. भावेश हा मोटार कार चालवत असताना मुलुंड टोल नाक्याच्या अलीकडे टाटा कंपनीचा ट्रक जी जे १६ -ए यु ४५८० हा मोटारीला घासून पुढे निघून गेला. दरम्यान भावेश याने ट्रक चा पाठलाग केला असता ट्रक आनंद नगर टोल नाका येथे दिसला.

भावेश याने मोटार बाजूला लावून भावेश आणि त्याचे काका मनीष सोनी हे दोघे ट्रक चालकाला जाब विचारण्यासाठी ट्रकच्या समोर येऊन थांबले. चालकाला ट्रकच्या खाली उतरण्यास सांगू लागताच ट्रक चालकाने मागे पुढे न बघता ट्रक सुरू करून थेट काका पुतण्याच्या अंगावर चढवला. सावध असलेले मनीष सोनी हे बाजूला झाले मात्र भावेशच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

ट्रक चालक नूर मोहम्मद अली याने ट्रक न थांबवता ट्रकसह ठाण्याच्या दिशेने पळ काढला, या घटनेची माहिती मिळताच नवघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून ट्रक चालक विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला. नवघर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी ट्रक चालक नूर मोहम्मद अली याला उत्तर प्रदेशात पळून जाण्यापूर्वी नाशिक येथून ताब्यात घेऊन त्याला अटक केली.

हे ही वाचा :

फक्त राजीनामा नाही, ही चूक सुद्धा उद्धवना भोवणार!

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयचा छापा

“अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबद्दल कल्पना नसल्याचे अजित पवार खोटं बोलत आहेत”

३० हजार पगारी इंजिनीअरचा लाखोंचा थाट!

या घटनेत मृत झालेला भावेश सोनी आणि काका मनीष सोनी हे भिवंडीत राहणारे असून त्यांचा भांड्याचा पारिवारिक व्यवसाय असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Exit mobile version