केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज हैदराबादच्या दौऱ्यावर होते. यावेळी अमित शहा यांच्या सुरक्षा व्यवस्थेत पुन्हा एकदा निष्काळजीपणा झाल्याचं समोर आलं आहे. अमित शहा यांच्या ताफ्यासमोर तेलंगाणा राष्ट्र समितीच्या (TRS) एका नेत्याने आपली गाडी पार्क केल्याची घटना घडली. यामुळे काही काल गोंधळ उडाला होता.
मुक्तीदिनानिमित्त अमित शहा हे शुक्रवार, १६ सप्टेंबर रोजी रात्री उशीरा हैदराबाद येथे पोहोचले होते. दरम्यान अमित शहा यांच्या ताफ्याच्या पुढे टीआरएस नेते गोसुला श्रीनिवास यांनी अचानक आपली गाडी उभी केली. या प्रकारामुळं सुरक्षा रक्षकांमध्ये खळबळ उडाली. पण यंत्रणांनी तात्काळ त्यांची गाडी तिथून हटवली.
The car stopped just like that. I was in tension. I will speak to them (Police officers). They vandalised the car. I will go, it's unnecessary tension: TRS leader Gosula Srinivas, in Hyderabad. pic.twitter.com/cxjPbYbbwR
— ANI (@ANI) September 17, 2022
मात्र, गाडीची तोडफोड केल्याचा आरोप श्रीनिवास यांनी केला आहे. तसेच कार चालवत असताना आपण तणावाच्या स्थितीत होतो त्यामुळे अचानक माझी कार त्या ठिकाणी थांबली. मात्र, कार हटवण्यापूर्वीच सुरक्षा रक्षकांनी माझ्या कारची तोडफोड केली, असा आरोप श्रीनिवास यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार असल्याचंही श्रीनिवास म्हणाले.
हे ही वाचा:
७० वर्षानंतर चित्ते आले भारतात, पंतप्रधान मोदींनी काढले फोटो
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
‘जॉन्सन बेबी पावडर’चा उत्पादन परवाना कायमचा रद्द
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गणेशोत्सवात मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा अमित शहा यांच्या ताफ्याच्या आसपास एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला होता. अखेर या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. एक व्यक्ती कोट, टाय आणि सरकारी ओळखपत्र घालून वावरत असलेला आढळून आली होती. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली होती.