22 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरक्राईमनामाअबब!! मुंबई विमानतळावरून वर्षभरात जप्त केले ६०० किलो सोने

अबब!! मुंबई विमानतळावरून वर्षभरात जप्त केले ६०० किलो सोने

कोरोनाच्या काळात थंडावलेले सोने तस्करीचे प्रमाण कोरोनाचे सर्व निर्बंध उठवल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

Google News Follow

Related

परदेशातून भारतात ड्युटी बुडवून सोनं आणण्याच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. वाढत्या सोने तस्करी सोबत सोन्याची तस्करी करण्याचा ट्रेंड देखील बदलला आहे. पूर्वी सोने तस्कराकडून सोन्याचे बिस्किटे, सोन्याच्या तारा, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस मध्ये सोन लपवून आणले जात होते, मात्र आता सोनं तस्करी करण्यासाठी विशिष्ठ प्रकारचा मेण वापरून त्यात सोने चिटकवून त्याची पेस्ट तयार करून आणली जात आहे. सोन्याची तस्करी करण्याऱ्या टोळ्यांकडून हे सोनं विमानतळातून सोन बाहेर करण्यासाठी विमानतळावरील कर्मचाऱ्याची मदत घेतली जात असल्याचे देखील सीमा शुल्क विभागाच्या कारवाईत समोर आले आहे.

कोरोनाच्या काळात थंडावलेले सोने तस्करीचे प्रमाण कोरोनाचे सर्व निर्बंध उठवल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मागील तीन वर्षांच्या तुलनेत सीमा शुल्क विभाग आणि डीआरआयने मागील वर्षभरात तब्बल ६०४ किलो सोने मुंबई विमानतळावरून जप्त केले आहे. ही कारवाई देशातील इतर विमानतळावर केलेल्या कारवाईच्या तुलनेत मोठी आहे. सीमा शुल्क विभाग आणि डीआरआयने मागील तीन वर्षांच्या तुलनेत २०२२ या वर्षात सुमारे ६०४ किलो सोनं मुंबईच्या विमानतळा वरून जप्त केले आहे. याप्रकरणी सोनं तस्करी करणाऱ्या अनेक टोळ्यांना अटक करण्यात आली होती. त्यात विमानतळा वरील कर्मचारी यांचा देखील समावेश असल्याची माहिती सीमा शुल्क विभागातील सूत्रांनी दिली आहे.

भारतात सोन्याच्या किंमतीत जसजशी वाढ होत आहे, तसतसे सोन्याच्या तस्करीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हवाई मार्गातून सोन्याची तस्करीचे प्रमाण मोठे असून सोन्याची तस्करी करण्यासाठी तस्कराकडून वेगवेगळ्या क्लुप्त्या लावून सोनं भारतात आणले जात आहे. सोन्याची पेस्ट तयार करून तर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, सामानाच्या बॅगेचा कप्यात सोनं दडवून ते विमानतळावर आणले जाते, विमानतळ कर्मचारी यांना पैसांचे लालच देऊन त्यांच्या मदतीने हे सोनं विमानतळावरून बाहेर काढले जाण्याचे अनेक प्रकार मागील काही वर्षांत डीआरआय आणि सीमा शुल्क विभागाच्या कारवाईत समोर आलेले आहे.

हे ही वाचा: 

बोरिवली रेल्वे स्टेशनवर विनयभंग करणाऱ्या भजन गायकाला अटक

मोदी-नेत्यानाहू यांच्यातील फरक राऊतांना कळतो तरी का?

कर्नाटकात एकाच टप्प्यामध्ये होणार निवडणुका

पुढची रामनवमी नव्या श्रीराम मंदिरात होईल?

सद्या सोन्याच्या तस्करीचा ट्रेंड बदलत चालला आहे असे सीमा शुल्क अधिकारी यांचे म्हणणे आहे. सोन्याची कस एका विशिष्ठ मेणाच्या पेस्टला चिटकवून या पेस्ट पासून कमरेचा पट्टा तयार करून, तर पँटच्या आत मध्ये ही पेस्ट चिटकवून सोन्याची तस्करी केली जात आहे. सीमा शुक्ल विभाग आणि डीआरआय ने २०२२ या एका वर्षात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत ६०४ किलो सोनं जप्त केले आहे. देशातील इतर विमानतळावर केलेल्या सोने तस्करीच्या कारवाईच्या तुलनेत मुंबई विमानतळात केलेली कारवाई सर्वात मोठी मानली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा