मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रूमला आज आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून धमकीचे मेसेज आले आहेत. २६/११ सारखा हल्ला मुंबईवर करणार असल्याचं या मेसेजेसमध्ये म्हटलं आहे. यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. ज्या क्रमांकावरून मेसेज आला आहे त्या क्रमांकावर ‘एबीपी माझा’च्या प्रतिनिधीने धमकीचा मेसेज आलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. यावेळी हा क्रमांक पाकिस्तानमधील असल्याचं समोर आलं आहे.
संबंधित क्रमांक हा पाकिस्तानमधील असून हा नंबर वापरणाऱ्या व्यक्तीचं नाव इम्तियाज असे आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीला या संदेशाबाबत काहीही कल्पना नाही. तो वापरत असलेल्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप नसून या घटनेनंतर भारतातून सतत त्याला कॉल येत असल्याने तो स्वत: डिस्टर्ब असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा:
मुंबई मे हमला होने जा रहा है, २६-११ की याद दिलाएगा
मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रूमला ‘हा’ धमकीचा मेसेज, यंत्रणा अलर्टवर
‘फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू’
१४ तास तपास; सिसोदियांना अटक होणार?
आज सकाळी मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रूमला धमकीचा मेसेज आला आहे. २६/११ सारखा हल्ला मुंबईत करणार असल्याचं म्हटलं आहे. भारतात सध्या सहा लोक असून ते काम करणार असल्याचं मेसेजमध्ये म्हटलं आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु असून काल राज्यभरात दहीहंडीचा उत्साह होता. तर गणेशोत्सव अगदी तोंडावर असून त्यापाठोपाठ सणांची लगबग सुरू आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर धमकीच्या मेसेजने आता खळबळ माजली आहे. सणासुदीच्या काळात मुंबईवर हल्ल्याचं सावट असून त्यामुळे आता पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.