काश्मीरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांनी घरातील कपाटाच्या मागे खोदला होता बंकर

तपासादरम्यान धक्कादायक खुलासा

काश्मीरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांनी घरातील कपाटाच्या मागे खोदला होता बंकर

काश्मीरमधील कुलगाममध्ये दोन दिवसांपूर्वी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली होती. यामध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले तर भारताचे दोन जवान हुतात्मा झाले. दरम्यान, खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या घराची पहाणी केली असता धक्कादायक बाब समोर आली आहे.

कुलगाममध्ये भारतीय जवान आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली होती. त्यामध्ये सहा दहशतवादी ठार झाले होते. हे दहशतवादी लपून बसलेल्या घराची पाहणी केली तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. या घरात एका कपाटाच्या मागे बंकर सापडला आहे. या दहशतवाद्यांनी चक्क एक बंकर खोदून ठेवला होता. चकमकीनंतर जवानांनी दहशतवादी लपलेल्या घराची झडती घेतल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एका घरात लाकडी कपाट दिसत आहे. कपाटाच्या मागे काही ड्रॉवर्स आहेत, जे काढल्यावर एक अरुंद रस्ता दिसून येतो. ही वाट बंकरकडे जाते. त्यामुळे या दहशतवाद्यांना कोणा स्थानिकांनी मदत केली आहे का याचा तपास सध्या सुरक्षा दलाकडून सुरू आहे.

हे ही वाचा:

बालाघाटमध्ये चकमक, १४ लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी ठार!

रायगडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस; किल्ल्याच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरुप

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून लष्कराच्या वाहनावर गोळीबार

खोट्या बातम्या देणाऱ्या मुस्लीम पत्रकारांवर गुन्हा

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ६ आणि ७ जुलै रोजी मुद्राघम, चिन्निगाम फ्रिसालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला होता. या चकमकीत सुरक्षा दलांनी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला. दोन जवानही हुतात्मा झाले. मारले गेलेले दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित होते. त्यापैकी एक पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी संघटनेचा स्थानिक कमांडर होता. चिन्निगाम फ्रिसालमध्ये ठार झालेल्या सहापैकी चार दहशतवादी या बंकरमध्ये लपून बसले होते, असा दावा केला जात आहे. जम्मू-काश्मीरचे डीजीपी आर आर स्वेन म्हणाले की, एवढ्या मोठ्या संख्येने दहशतवाद्यांना ठार मारणे ही मोठी उपलब्धी आहे. सुरक्षा वातावरण मजबूत करण्याच्या दिशेने हा एक मैलाचा दगड आहे.

Exit mobile version