गुन्हेगारी टोळी प्रमुख छोटा राजन याने २०११ साली विरुद्ध गुन्हेगारी टोळीचा प्रमुख दाऊद कासकरचा भाऊ इकबाल कासकरचा बॉडीगार्ड आरिफ बैल याला जीवे ठार मारण्याचे फर्मान काढले होते. त्याप्रमाणे छोटा राजनचा विश्वासू सहकारी रवी मल्लेश बोरा उर्फ डिके राव बिलाल सय्यद मुस्तफा सय्यद व इतर सात लोकांनी आरिफ बैलला ठार मारले होते.
नागपाडा पोलीस ठाणे मुंबई हद्दीत गोळीबार करून त्याला ठार मारले होते. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी डिके राव छोटा राजन व इतर आरोपींविरुद्ध नागपाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. नमूद गुन्ह्यात बिलाल सय्यद मुस्तफा सय्यद यास व इतर आरोपींना जन्म ठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती.
सदर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला फायरिंग मधील मुख्य आरोपी बिलाल सय्यद मुस्तफा सय्यद हा नागपूर कारागृह येथून पेरोलवर रजेवरून फरार झाला होता. त्याबाबत मुंब्रा पोलीस ठाण्यात गु. र. नं.669 /22 IPC 224 प्रमाणे गुन्हा दाखल होता. या आरोपीचा शोध या पथकाकडून चालू होता.
हे ही वाचा:
मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रूमला ‘हा’ धमकीचा मेसेज, यंत्रणा अलर्टवर
१४ तास तपास; सिसोदियांना अटक होणार?
कंबोज यांच्यानंतर आता निंबाळकरांचा ईडीस्फोट
निर्बंधमुक्त दहीहंडीमुळे गोविंदा घेतायत मोकळा श्वास
यादरम्यान या पथकाचे पोलीस नाईक भामरे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे व तांत्रिक तपासाच्या आधारे या पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव, एएसआय स्वप्नील प्रधान पोहा भुरके, पोलिस शिपाई ठाकरे व पथक यांनी या आरोपीला मुंब्रा येथून ताब्यात घेऊन त्याला वैद्यकीय तपासणी करून त्याला मुंब्रा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.