चंदीगड विद्यापीठात मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका मुलीने इतर मुलींचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ काढून तरुणाला पाठवून दिले आणि हे व्हिडीओ तरुणाने सोशल मीडियावर व्हायरल केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबद्दल माहिती समोर येताच यातील आठ संबंधित बाब समोर येताच काही तरुणींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून आता व्हिडीओ तयार करणाऱ्या मुलीचा एका व्हिडीओ समोर आला आहे.
संबंधित तरुणीला एक शिक्षिका ओरडत असून तिने हे असं का केलं याची विचारणा करण्यात येत आहे. तिने एका तरुणाच्या सांगण्यावरून हे केल्याचे ती सांगत आहे. तसेच हा तरुण शिमाल्याचा असून आपण त्याला ओळखत नाही असंही ही तरुणी बोलताना दिसत आहे.
This girl viral the 60 girls mms in Chandigarh university kindly take strict action on this girl @INCChandigarh @narendramodi @ChandigarhUT #chandigarhuniversity #justiceforcugirls pic.twitter.com/7JVHN0oBNZ
— Shanu XD (@shanu00001) September 17, 2022
हे ही वाचा:
राज ठाकरेंनी विदर्भात निवडणूक तयारीचे दिले आदेश
मोदींच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा जागतिक विक्रम
होस्टेलमधील ६० मुलींचे व्हिडीओ व्हायरल, आठ जणींचा आत्महत्येचा प्रयत्न
दसरा मेळाव्यासाठी शिंदेंचा अर्ज स्वीकारला, ठाकरेंचा अर्ज फेटाळला
चंदीगड विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका मुलीने ६० मुलींचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर तिने तो व्हिडीओ एका तरुणाला पाठवून दिला. हे व्हिडिओ तरुणाने सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी चंदीगड विद्यापीठाला घेराव घातला होता. तर आठ विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.