नवाब मलिकांचा मुक्काम वाढला

आणखी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

नवाब मलिकांचा मुक्काम वाढला

राष्ट्रवादी पक्षाचे नेते नवाब मलिक यांची एक किडनी निकामी झाली असून त्यांना तात्काळ रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यासाठी ईडी प्रयन्त करत असल्याचा दावा नवाब मलिक यांच्या वकिलांनी केला आहे. मुंबईतील साखळी बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची संपत्ती खरेदी केल्याच्या आरोपात तुरुंगात असलेले आरोपी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना आज  जामीन देण्यास पुन्हा एकदा नकार दिला असून त्यांच्या पोलीस कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ सुद्धा करण्यात आली आहे.

त्यामुळे आता मलिकांच्या अडचणी अजून वाढल्या आहेत. न्यायालयाने  जामीन   नाकारल्यानंतर नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतल्यानंतर आता हायकोर्टाने सुद्धा मलिकांची कोठडी कायम ठेवली आहे. ईडीने राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांनी कुर्ला येथून दाऊदची संपत्ती खरेदी केल्याचा आरोप केला आहे. कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक , सलीम पटेल, सरदार खान , दाऊदची बहीण हसीना पारकर या सर्व जणांनी मूळ मालक होता त्याला धमकावून, जबरदस्तीने  हा जमिनीचा व्यवहार केला  होता. मलिकांनी जेव्हा जमीन खरेदी केली त्यावेळेस कोणतीच पडताळणी केली नव्हती. असेही ईडीने आरोपपत्रात म्हंटले आहे.

हे ही वाचा:

खलिस्तानवाद्यांची भ्याड धमकी; इंदिरा गांधींबाबत जे झाले तसेच अमित शहांच्या बाबतीत होईल!

आपला ठाकरे होणार नाही, याचे भान बाळगण्याची गरज…

संजय राऊत म्हणतात, श्रीकांत शिंदेंनी मला मारण्याची सुपारी दिली!

शिंदे आणि ठाकरे गट काय युक्तिवाद करणार ?

मालिकांच्या वकिलांचे म्हणणे काय?

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक वर्षभरापासून तुरुंगात आहेत. त्यांची एक किडनी निकामी झाल्यामुळे सध्या त्यांचे शरीर एकाच किडनीवर काम करत आहेत.  रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून ईडीकडून त्यांना  डिस्चार्ज   घेण्यासाठी घाई केली जात असल्याचा आरोप नवाब मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी केला आहे. नवाब मलिक सध्या कुर्ला येथील    क्रिटी  केअर रुग्णालयात उपचार घेत आहेत. लवकरच त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांट केले जाणार असून त्यांच्यावर अजून चांगले उपचार करण्यासाठी त्यांना मोठ्या रुग्णालयांत दाखल केले जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

Exit mobile version