प्रयागराजमधील नैनीमधील इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्याने इलेक्ट्रॉनिक बससेवाच्या कंडक्टरवर सुऱ्याने प्राणघातक हल्ला केला होता. तेव्हा या कंडक्टरला गंभीर परिस्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तरुणाबाबत आता गंभीर बाब उघड झाली आहे. त्याने चार दिवसांपूर्वीच स्वतःच्या व्हॉट्सअप स्टेटसवर कट्टरपंथी मौलानाचे भाषण ठेवले होते. ही बाब त्याच्या मित्रांनी पोलिसांना चौकशीत सांगितली आहे.
यापूर्वीही या विद्यार्थ्याने अशा प्रकारचे स्टेटस अनेकदा ठेवले आहे. दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी ज्या तीन मित्रांची चौकशी केली, त्यातील दोन त्याच्या कॉलेजमध्येच शिकतात. त्यातील एक त्याचा चुलतभाऊ आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाइलच्या पडताळणीत हा विद्यार्थी या तीन मित्रांच्या अधिक संपर्कात असल्याचे आढळले होते. हा विद्यार्थी या तिघांशी सातत्याने बोलत असे. या तिघांना शनिवारी नैनी पोलिस ठाण्यात बोलावून त्यांची अनेक तास कसून चौकशी करण्यात आली.
हे ही वाचा:
गिरगावमधील चारमजली इमारतीला आग; दोन ठार!
मुंबई पोलिसांकडून ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान गुन्हेगाराची नाकाबंदी!
मिर्झापुरचा कुख्यात दरोडेखोर मुंबईत जेरबंद!
मुंबई वाहतूक विभागाकडून २५० कोटी रुपये दंडाची वसुली!
दहशतवादविरोधी पथकाने आरोपी विद्यार्थ्याबाबत त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रात्री त्यांना घरी जाण्यास सांगितले. या चौकशीत आरोपी विद्यार्थ्याने चार दिवसांपूर्वी कट्टरपंथी मौलानाचे उर्दूमध्ये लिहिलेले भाषण सोमवारी स्टेटस म्हणून ठेवले होते. याआधीही त्याने अशाप्रकारे स्टेटस अपडेट ठेवल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली. तो कॉलेजमधील अन्य विद्यार्थ्यांमध्ये मिळून मिसळून वागत नसे, असेही उघड झाले आहे. त्याच्याकडून लॅपटॉप आणि मोबाइल जप्त करण्यात आला असून त्याचीही माहिती घेतली जात आहे. लवकरच त्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल.
जखमी कंडक्टर आणि आरोपीही रुग्णालयात
या घटने जखमी झालेल्या कंडक्टरवर अद्याप उपचार सुरू आहेत. तर, आरोपीलाही स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.