माजी आयबी अधिकाऱ्याच्या अंगावर घातली गाडी

या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.

माजी आयबी अधिकाऱ्याच्या अंगावर घातली गाडी

आयबीचे माजी अधिकारी आर.एन कुलकर्णी यांचा कर्नाटकातील म्हैसूर येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. म्हैसूरच्या मानस गंगोत्री परिसरात शुक्रवारी संध्याकाळी आयबीचे माजी अधिकारी आर के कुलकर्णी नेहमीप्रमाणे फिरायला गेले असता ही घटना घडली आहे. सुरुवातीला ही घटना रस्ता अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र आतापर्यंतच्या तपासानुसार आता हा नियोजित खून झाल्याचे म्हटले आहे .

या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. त्या सीसीटीव्ही फुटेजवरून हा खूनही असू शकतो, अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली. एक कार त्यांच्या अंगावर मुद्दाम धावत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. पोलिसांनी आता ही घटना हत्या असल्याचे समजून त्या गाडीचा शोध सुरू केला आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, ८३ वर्षीय माजी अधिकारी म्हैसूर विद्यापीठाच्या मनसा गंगोत्री कॅम्पसमध्ये नेहमीप्रमाणे फिरायला जात असताना एका वाहनाने त्यांना धडक दिली. या घटनेनंतर कुलकर्णी यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

यादरम्यान, भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी याप्रकरणी ट्विट केले आहे. आयबीमध्ये दीर्घकाळ सेवा बजावणारे व जिहादवरील पुस्तकाचे लेखक, सेवानिवृत्त अधिकारी कुलकर्णी (८३ वर्षे) यांची मैसूर येथे गाडी अंगावर घालून हत्या करण्यात आली आहे. हे कोण असेल याचा अंदाज आपण बांधू शकतो. या हत्येमागील देशद्रोही षडयंत्रकाऱ्यांचे आव्हान संपूर्ण देशाने स्वीकारले आहे, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

हे ही वाचा:

‘अजित पवारांची कुणालाही गॅरंटी नाही’

‘मराठी मुस्लिम संकल्पनेचा प्रचार करणारे तोतया’

एका लग्नाची पुढची गोष्टचा १२,५०० वा प्रयोग, राज-फडणवीस उपस्थित राहणार

दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांना राष्ट्रवादीकडून ती मदत अद्याप नाही, पत्नीने केली विनंती

दरम्यान, शुक्रवार, ४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता मानसा गंगोत्री येथे आर के कुलकर्णी यांना कारने धडक दिली. या अपघाताची सखोल चौकशी केली असता हा अपघात नसून खून असल्याचा निष्कर्ष निघाला आणि त्यानुसार आम्ही आमचा तपास सुरू केला, असे पोलिसांनी सांगितले आहे. तपासासाठी सहायक पोलिस आयुक्त नरसिंहराजे यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तयार करण्यात आली असल्याचीही माहिती आहे.

Exit mobile version