काही दिवसांपूर्वी मुंबई वाहतूक पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिवे मारण्याच्या धमकीचा मेसेज आला होता. तर त्यापूर्वी पंतप्रधान कार्यालयाच्या आयडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकीचा मेल आला होती. या प्रकरणात शनिवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकावल्याच्या आरोपाखाली अमन सक्सेना या तरुणाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एक तरुणी आणि गुजरातमधील एका तरुणाचं नाव समोर आले आहे.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान कार्यालयाच्या मेल आयडीवर मोदींना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर यंत्रणा सतर्क झाल्या होत्या आणि त्यांनी शोधमोहीम सुरु केली होती. त्यानुसार या प्रकरणात गुजरातमधील एक तरुण आणि तरुणीचं नाव समोर आले होते. त्यानंतर गुजरात एटीएस या प्रकरणात सक्रिय झाली. संयुक्त पथक तिन्ही आरोपींचा शोध घेत होते. यादरम्यान, अमन या आरोपीचं लोकेशन ट्रेस होताच हे पथक रात्री त्या ठिकाणी पोहचले. आरोपींनी कोणत्या उद्देशाने पंतप्रधानांना धमकी दिली, याचा तपास सुरू आहे. गुजरात एटीएसचे निरीक्षक बघेला यांनी इतर दोन आरोपींबाबत कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही.
आरोपी अमन सक्सेना याचिका रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतले. गुजरात एटीएसचे निरीक्षक व्ही.एन बघेला हे पथकासह रात्री दहाच्या सुमारास सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात पोहोचले. यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीनं अमन सक्सेनाला आदर्शनगरमधून अटक करण्यात आली.
हे ही वाचा :
फडणवीस उद्धव ठाकरेंना म्हणाले, काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही …!
शिंदे गटातील आमदारांनो प्लिज नाराज व्हा ना!
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी विक्रम गोखले यांना वाहिली श्रद्धांजली
बुलढाण्यात उद्धव ठाकरेंचे तेच ते रडगाणे!
दरम्यान, मंगळवार, २२ नोव्हेंबर रोजीसुद्धा मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हाट्सअपवर मोदींना मारणार असल्याचा मेसेज आला होता. दाऊदचे दोन हस्तक मोदींना मारणार अशा प्रकारचा मेसेज आला होता. ऑडिओ क्लीपमध्ये मुस्तका अहमद आणि नवाज या दोन हस्तकांची नावं सुद्धा घेण्यात आली होती. या मेसेज नंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या होत्या.