महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल सोशल मीडियावर धमकीचा संदेश देणाऱ्या तरुणाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांनी पुण्यातून १९ वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. आरोपीला मुंबईला आणल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती आहे.
ताब्यात घेण्यात आलेला आरोपी हा संगणक क्षेत्रातील पदवीधर असून त्याला संगणक तंत्रज्ञानाबद्दल चांगली माहिती आहे. संबंधित प्रकरणातील आरोप हा मूळचा नांदेड येथील रहिवासी असून सध्या तो पुण्यामध्ये राहतो. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुंड कसे बनावयचे या विषयावर एक पोस्ट अपलोड करण्यात आली होती. त्याला उत्तर म्हणून या १९ वर्षीय तरुणाने एक पोस्ट केली होती. त्यात या मुलाने ज्याचे लक्ष्य मुख्यमंत्री असेल, त्याला मी बंदुक द्यायला तयार आहे, अशा आशयाची पोस्ट केली होती.
ही पोस्ट पाहिल्यानंतर पोलिसांना तक्रार प्राप्त झाली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ संबंधित प्रोफाईलचा वापर करण्याऱ्याबाबतची माहिती पोलिसांनी घेतली. त्यावेळी संशयीत पुण्यामध्ये असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार एक पथक तातडीने पुण्यात दाखल झाले. त्यांनी संशयीत तरुणाला ताब्यात घेतले आहे.
हे ही वाचा:
पंजाबच्या शेतांत काम करणारे शेतकरी आंदोलनात सहभागी का नाहीत?
आसामचे समान नागरी कायद्याच्या दिशेने पाऊल
भारतातून नोकरीसाठी रशियात गेलेल्या तरुणांचा युद्धासाठी वापर!
धक्कादायक! नवजात बाळ रडू नये म्हणून तोंडाला लावली ‘टेप’!
प्राथमिक चौकशीत गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर आरोपीला घेऊन मुंबई पोलिसांचे पथक मुंबईला निघाले आहे. मुंबईत आणल्यानंतर याप्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे.