पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या कार अपघातात नवनवे पुरावे समोर येत असून हे प्रकरण वेगळ्याच प्रकारे बाहेर येत आहे. पोलिसांनी केलेलं दुर्लक्ष, त्यावरून दोन पोलिसांचे निलंबन, पुढे ब्लड सॅम्पलची अदलाबदल आणि त्या प्रकरणी ससूनमधून डॉक्टरांना झालेली अटक यानंतर आता या प्रकरणात आणखी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आलेली आहे. अतुल घटकांबळे नावाच्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी वेदांत याच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना अटक करण्यात आली. हे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात फेकण्यात आले होते. आता नव्या माहितीनुसार, ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी पैसे पुरवण्यात आले होते. ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी पैसे पुरवण्यात अतुल घटकांबळे नावाच्या व्यक्तीचा हात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
तीन लाख रुपये घेऊन आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात फेकल्याप्रकरणी ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे. ससूनच्या दोन डॉक्टरांनी आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल याच्या म्हणण्यानुसार ब्लडचा रिपोर्ट बदलला असल्याचं समोर आलं आहे.
हे ही वाचा:
मुलींची बाजी, कोकण ‘गुणवत्ता यादीत’ अव्वल
अंतरिम जामिनाच्या मुदतवाढीसाठी केजरीवालांची धावाधाव
दिवाळी पूर्वीच विधानसभेच्या निवडणुकीचे फटाके?
पुणे अपघात: आरोप टाळण्यासाठी वेदांतचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात फेकले
अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे ब्लड गोळा करण्यात आले होते, ते दुसऱ्या व्यक्तीचे होते. तेच ब्लड फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले होते. आरोपीचे ब्लड सॅम्पल ससूनच्या डॉक्टरांनी घेऊन ते डस्टबीनमध्ये फेकले. एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल घेतले आणि त्यावर आरोपीचे नाव लिहून तेच फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले, असा धक्कादायक खुलासा आयुक्तांनी केला आहे.