मुंबई शहरात सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती करण्यात आली आहे. आंतरधर्मीय विवाह मान्य असल्यामुळे पित्याने मुलाच्या मदतीने मुलगी आणि जावयाची हत्या करून मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याची खळबळ जनक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. गोवंडी पोलिसांनी याप्रकरणी हत्याचा गुन्हा दाखल करून मुलीचे वडील, भाऊ,नातलगासह सहा जणांना अटक केली असून त्यात तीन विधिसंघर्ष बालकाचा समावेश आहे.
करण रमेश चंद्र (२२) आणि गुलनाज खान (२०) असे हत्या करण्यात आलेल्या जोडप्यांची नावे असून या दोघांच्या हत्येप्रकरणी मुलीचे वडील गोरा रहीद्दीन खान (५०), भाऊ सलमान गोरा, मोहम्मद कैफ नौशाद खान यांच्या सह तीन विधिसंघर्ष बालकांना अटक करण्यात आली आहे. मृत आणि आरोपी हे उत्तरप्रदेश राज्यात राहणारे आहेत. १४ ऑक्टोबर रोजी गोवंडी पोलिसांना टेलिकॉम फॅक्टरी या ठिकाणी असलेल्या विहिरीत एका तरुणाचा मृतदेह मिळून आला होता.
पोलिसानी मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता हा तरुण धारावी येथे राहण्यास असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी अधिक माहिती काढली असता करण चंद्र असे या तरुणाचे नाव असून तो आपल्या पत्नीसोबत राहण्यास होता, त्याची पत्नी देखील बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या तपासात हे करण आणि त्याची पत्नी गुलजार हे उत्तरप्रदेश राज्यातील बांदा जिल्ह्यात राहणारे असून या दोघांनी वर्षभरापूर्वी मुंबईत पळून येऊन लग्न केले. हे लग्न गुलजारच्या वडिलांना आणि भावाला मान्य नव्हते अशी माहिती समोर आली.
हे ही वाचा:
गाझा पट्टीतील रुग्णालयावरील हल्ला कोणी केला?
ठरले; भारत २०३५ पर्यंत अंतराळ स्थानक उभारणार, २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठवणार
श्वानांच्या मदतीने इस्रायलमधील पीडितांना देणार दिलासा
आता इस्रायलचे प्रमुख लक्ष्य हमासचा ‘क्रूरतेचा चेहरा’
पोलिसांनी तात्काळ मुलीचा पिता गोरा खान आणि भाऊ सलमान या दोघांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. करण याच्या हत्येनंतर गुलजार हिची देखील हत्या करून मृतदेह नवी मुंबई कळंबोली येथील झाडीत फेकल्याची कबुली दोघांनी दिली. गोवंडी पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन मोहम्मद कैफ नौशाद खान यांच्यासह तीन विधीसंघर्ष बालक यांना ताब्यात घेवुन त्याच्या विरुद्ध हत्या, पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. विधीसंघर्ष बालकांना बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.