मामाशी असलेल्या वैमनस्यातून मोहोळचा झाला ‘गेम’

पोलिसांची माहिती

मामाशी असलेल्या वैमनस्यातून मोहोळचा झाला ‘गेम’

पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याची शुक्रवारी तीन हल्लेखोरांनी भरदुपारी गोळ्या घालून हत्या केली. या हत्या प्रकरणाचा सूत्रधार आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असल्याची माहिती समोर आली आहे.या हत्येसंदर्भात पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

शुक्रवार, ५ जानेवारी रोजी भर दुपारी शरद मोहोळ याची गोळ्या घालून हत्या केली. शरद मोहोळ कोथरुडमधील सुतारदरा या ठिकाणी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी त्याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ त्याच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळला कोथरुडमधीलच खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.ते म्हणाले, शुक्रवार रोजी गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला.पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासा प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, शरद मोहोळ याच्या सोबत असलेला मुख्य आरोपी साहिल पोळेकर याने हल्ला केला.आमच्या पथकाने सीसीटीव्हीच्या आरोपींचा शोध घेतला आणि सातारा रोडवरील शिरवळ जवळ दोन चार चाकी वाहनातून एकूण आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा:

मध्यप्रदेशात बालगृहातून २६ मुली बेपत्ता; धर्मांतर केल्याची भीती!

अवघ्या १० दिवसांत अंबती रायुडू वायएसआर काँग्रेसमधून ‘आऊट’!

पन्हाळ्याच्या शेजारी पावनगडावरील बेकायदेशीर मदरसा केला जमीनदोस्त

मार्कोस कमांडोनी जहाज घेतले ताब्यात; वाचवले भारतीयांचे प्राण!

प्राथमिक तपासानुसार साहिल पोळेकर याचे मामा नामदेव कानगुडे आणि दुसरे नातेवाईक विठ्ठल किसन गांजने यांचे शरद मोहोळसोबत वैमनस्य होते. त्यातून ही हत्या झाली आहे.साहिल याच्या मनात अनेक दिवसांपासून शरद मोहोळ याच्या हत्येचा विचार असण्याची शक्यता आहे. यामुळे साहिल पोळकर आधी शरद मोहोळसोबत राहणाऱ्या लोकांच्या संपर्कात आला. त्यानंतर तो शरद मोहोळ गँगमध्ये सामील झाला, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यानंतर संधी साधून शरद मोहोळ याच्यावर तिघांनी गोळ्या झाडल्या आणि आरोपी दुचाकीवरुन फरार झाले.आरोपींचा तपास करत शिरवळ येथूल आठही जणांना अटक करण्यात आली असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.या आठ पैकी दोन वकीलही होते.वकिलांची देखील चौकशी करण्यात येत आहे.आरोपी पोळेकरने हे पिस्तूल तीन चार महिन्यापूर्वीच घेतले असल्याचे सांगितले.याच पिस्तूलने शरद मोहोळवर गोळ्या झाडण्यात आल्या. अटक करण्यात आलेले अनेक आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Exit mobile version