ती गाडी आपला मुलगाच चालवत होता….अल्पवयीन आरोपीच्या आईने दिली कबुली

अटकेनंतर कोठडीत रवानगी

ती गाडी आपला मुलगाच चालवत होता….अल्पवयीन आरोपीच्या आईने दिली कबुली

पुणे अपघातप्रकरणी नव्याने खुलासे होत असताना अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. अशातच आता अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला ५ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. याच आरोपाखाली शिवानी अग्रवाल यांना ताब्यात घेण्यात आले होते. तसेच रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप देखील शिवानी अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवानी अग्रवाल या घरी नव्हत्या. अखेर पोलिसांनी त्यांना शोधून अटक केली आहे. त्यानंतर अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला ५ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच अपघाताच्या वेळी आपला मुलगाच गाडी चालवत असल्याची कबुली आईने दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवे वळण येण्याची शक्यता आहे.

अल्पवयीन आरोपीच्या रक्त नमुन्यामध्ये फेरफार केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी आरोपीच्या आईने रक्त दिल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आली होती. दुसरीकडे पोलीस अल्पवयीन मुलाचीही चौकशी करणार आहेत. सहाय्यक पोलिस आयुक्त आणि दोन महिला पोलिसांकडून अल्पवयीन मुलाची चौकशी करण्यात येणार आहे. अपघातानंतर अल्पवयीन मुलाची कोणतीही चौकशी झाली नव्हती. पुणे पोलिसांनी बाल हक्क न्याय मंडळाला पत्र लिहून अल्पवयीन मुलाच्या चौकशीची परवानगी मिळण्यासाठी मागणी केली होती. त्यानंतर आता बाल हक्क न्याय मंडळाने पोलिसांना चौकशीसाठी परवानगी दिली.

हे ही वाचा:

“एनडीएमध्ये येण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू”

निवडणूक झाली, एक्झिट पोल्सही जाहीर आता नरेंद्र मोदी लागले कामाला

आंध्र प्रदेशमध्ये २५ जागांपैकी २१ ते २३ जागांवर भाजपा

अमेरिकेच्या संघात भारताचा आवाज; कॅनडाविरोधात पारडे जड

तसेच पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल आणि त्याचे वडिल सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर ड्रायव्हरला धमकावल्याप्रकरणी आणि अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ससूनमध्ये रक्त नमुन्यात फेरफार करणाऱ्या दोन डॉक्टरांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांना निलंबित देखील करण्यात आले आहे.

Exit mobile version