26 C
Mumbai
Tuesday, December 31, 2024
घरक्राईमनामाबंगळूरू कॅफे ब्लास्टच्या मास्टरमाइंडचे वडील होते सैन्यदलात; मुलाच्या कृत्याने दुःखी

बंगळूरू कॅफे ब्लास्टच्या मास्टरमाइंडचे वडील होते सैन्यदलात; मुलाच्या कृत्याने दुःखी

कॅफेमध्ये आयईडी पेरणारा आरोपी मुसवीर शाजीब परदेशी हँडलरच्या सतत संपर्कात

Google News Follow

Related

बंगळूरू रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच ‘एनआयए’ने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे. मुसावीर हुसेन शाजीब आणि अब्दुल मतीन ताहा अशी दोघांची नावे असून दोघेही आपली ओळख लपवून राहत होते. या प्रकरणात, दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या (IS) विचारसरणीने प्रेरित असलेल्या कर्नाटकातील शिवमोगा तीर्थहल्ली मॉड्यूलचा सहभाग समोर येत आहे. तसेच १ मार्च रोजी झालेल्या बॉम्बस्फोटापूर्वी आणि नंतर कॅफेमध्ये आयईडी पेरणारा मुख्य आरोपी मुसवीर हुसेन शाजीब हा परदेशी हँडलरच्या सतत संपर्कात होता, असेही समोर येत आहे. अशातच बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या मास्टरमाइंडच्या वडिलांना आपल्या मुलाच्या दुष्कृत्यांमुळे दुःख झाल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

शुक्रवार, १२ एप्रिल रोजी मुसावीर हुसेन शाजीब आणि अब्दुल मतीन ताहा यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले यानंतर त्यांच्या घरच्यांना अत्यंत दुःख झाले असून आपल्या मुलांच्या अशा कामावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अब्दुल ताहा याचे वडील मन्सूर अहमद हे माजी सैनिक आहेत. आपल्या मुलाच्या कथित दहशतवादी कारवायांमुळे ते त्रस्त झाले होते. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर तीर्थहल्ली येथे ते स्थायिक झाल्याची माहिती आहे. त्यांनी याबद्दल खेद व्यक्त केला की, त्यांनी अभिमानाने देशाची सेवा केली, तर त्यांच्या मुलाने मात्र सर्व उलट करत ही दुष्कृत्ये केली. मुलगा उलट करत होता.

दुसरा आरोपी मुसावीर शाजिबचे वडील नुरुल्ला हे शेतकरी होते. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी कुटुंबाला घेऊन तीर्थहल्ली येथील त्यांच्या वडिलांच्या घरी गेली. चार भावंडांमध्ये शाजेब तिसरा आहे. तर त्याचा लहान भाऊ शिक्षण घेत असून मोठा भाऊ कपड्यांचा व्यवसाय करतो आणि आणखी एकाचे मोबाईलचे दुकान आहे. शाजिब आणि ताहा हे बालपणीचे मित्र आहेत. दोघेही तीर्थहल्ली येथील हायस्कूलमध्ये शिकले आहेत. यापूर्वी दोघेही अल-हिंद नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. यानंतर ते इस्लामिक स्टेट विचारसरणीने प्रेरित तीर्थहल्ली मॉड्यूलशी जोडले गेले.

हे ही वाचा:

लेबनानचा उत्तर इस्रायलवर रॉकेट हल्ला

अल्पवयीन यझिदी मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आयएसआयएसच्या दोन दहशतवाद्यांना जर्मनीत अटक

अयोध्येमध्ये राम मंदिर, जगभरात वाढता भारताचा मान!

दिल्लीची लखनऊवर मात

कॅफेमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्यानंतर मुसावीर शाजिब बीएमटीसीच्या बसमध्ये गोरगुंटेपाल्यासाठी चढला. त्यानंतर अनेक मार्ग बदलून ते आंध्र प्रदेशात पोहोचले. तेथून पुन्हा ओडिशामार्गे कोलकाता येथे पोहोचले. दुसरीकडे अब्दुल मतीन ताहा तामिळनाडूमार्गे कोलकाता येथे पोहोचला होता. दोघेही इथे येऊन भेटले. ते दोघेही येथून नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, अशी माहिती आहे. त्यानंतर अलीकडे नेपाळमध्ये काही तणाव निर्माण झाल्याने सीमेवर कडक बंदोबस्त ठेवल्याने ते सीमा ओलांडू शकले नाहीत. अटक करण्यात आलेले आरोपी १ मार्च ते १२ एप्रिलपर्यंत कुठे राहिले आणि त्यांना कोणी मदत केली याचाही शोध एनआयए करत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा