बॉलीवूड अभिनेता सलमान खानला मंगळवार, ५ नोव्हेंबर रोजी लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून नव्याने धमकी मिळाली होती. धमकी देणाऱ्याने पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. तसेच माफी मागण्याचेही म्हटले होते. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात होता. अशातच सलमान खान धमकी प्रकरणात एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.
सलमान खान याला ठार करण्याची धमकी देणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. या तरुणाने मेसेजद्वारे सलमान खानला जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसंच काळवीट शिकार प्रकरणी माफी माग किंवा पाच कोटींची खंडणी भरायला तयार राहा अशी मागणी केली होती. या प्रकरणात आता विक्रम नावाच्या एका तरुणाला कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आम्ही पुढील तपास करत आहोत असं पोलिसांनी सांगितलं आहे.
अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पुन्हा धमकी मिळाली होती. माहितीनुसार, मुंबई पोलीस वाहतूक नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सऍप क्रमांकावर लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने धमकीचा संदेश आला होता. या मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला होता की, “मी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ बोलतोय आणि जर सलमान खानला जिवंत राहायचे असेल तर त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी किंवा पाच कोटी रुपये द्यावेत. तसे न केल्यास जीवे मारले जाईल. आमची गँग आजही सक्रिय आहे.” यानंतर पोलिसांकडून मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात होता.
हे ही वाचा :
‘संजय वर्मा राज्याचे नवे पोलीस महासंचालक’
‘गाझावर १० ट्वीट, पण कॅनडातील हिंदूंबाबत मौन’
न्यायालयाचे स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येकवेळी सरकारविरोधात निर्णय नव्हे!
दिल्लीतील हवेची गुणवत्ता घसरली पराली जाळल्यामुळे आणि गाड्यांच्या धुरामुळे
काही दिवसांपूर्वी सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी नोएडा येथून एका व्यक्तीला अटक केली होती. मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक हेल्पलाइन क्रमांकावर व्हॉट्सऍप मेसेज पाठवून सलमान खानकडून दोन कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, एप्रिल २०२४ मध्ये सलमानच्या घरावर गोळीबारही करण्यात आला होता. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.