बंगळूरूमधील कोरमंगला येथील वसतिगृहात बिहारमधील २४ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी शनिवारी मध्य प्रदेशातून मुसक्या आवळल्या आहेत. अभिषेक असे आरोपीचे नाव असून त्याने २३ जुलैच्या रात्री कृती कुमारी हिची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर तो मध्य प्रदेशात पळून गेला.
कृती कुमारी ही बिहारमधील २४ वर्षीय तरुणी बंगळुरू येथील पीजीमध्ये राहताना मंगळवारी रात्री उशिरा निर्घृण हत्या करण्यात आली. शहरातील एका खाजगी कंपनीत काम करणारी कृती नुकतीच कोरमंगला येथील व्हीआर लेआउट पीजीमध्ये राहायला गेली होती. कृती ही हल्लेखोराच्या मैत्रिणीची सहकारी होती. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने मंगळवारी रात्री ११.३० वाजता व्हीआर लेआउटमध्ये असलेल्या पीजी हॉस्टेलमध्ये प्रवेश केला आणि तिसऱ्या मजल्यावर त्याने चाकूने कृतीचा गळा चिरला. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा..
काँग्रेस आमदाराने विधानसभा अध्यक्षांबद्दल वापरले अपशब्द
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारताचा दिमाख
जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा, एक जवान हुतात्मा
नवी मुंबईत इमारत कोसळली, अनेक जण अडकल्याची भीती, दोघांची सुटका
पोलिसांनीही या घटनेसाठी पीजी हॉस्टेल मालकाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले आहे. पोलिसांनी सांगितले की, ही तरुणी मूळची बिहारची असून, २४ वर्षीय कृती कुमारी असे तिचे नाव आहे. ती बेंगळुरूमध्ये एका खासगी कंपनीत काम करत होती. आरोपी अभिषेक हा एक बॅग घेऊन पीजी हॉस्टेलमध्ये शिरल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. तिने काही वेळाने दार उघडल्यावर तो तिला तिच्या केसांना पकडून खेचत बाहेर काढताना दिसत आहे. त्यानंतर तिच्यावर चाकूने हल्ला करू लागतो. यादरम्यान, पीडितेने हल्ल्याला विरोध केला पण, मारेकऱ्याने तिच्यावर हल्ला सुरूच ठेवला आणि शेवटी तिचा गळा चिरला. मोठा आवाज ऐकून वसतिगृहात उपस्थित असलेल्या इतर मुली घटनास्थळी येतात पण, एकही मुलगी मदतीला पुढे आल्याचे दिसत नाही.