अंतरवली सराटीमधील दगडफेकीच्या घटनेतील मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या

आरोपीकडून गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसं जप्त

अंतरवली सराटीमधील दगडफेकीच्या घटनेतील मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या

मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही पेटलेला असताना काही दिवसांपूर्वी जालन्यात आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज झाला होता त्यानंतर दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. अंतरवली सराटी  येथील उपोषण स्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या राड्यानंतर लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली होती. या दगडफेकीच्या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ऋषिकेश बेदरे असे या आरोपीचे नाव आहे.

या घटनेतील प्रथम आरोपी ऋषिकेश बेदरेला जालन्यातील अंबड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी बेदरे कडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसं जप्त करण्यात आले आहे. अंतरवाली सराटीच्या घटनेनंतर ऋषिकेश बेदरेवर गोंदी पोलीस ठाण्यात कट रचून जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याचा शोध घेत असताना तो इतर दोन साथीदारांसह सापडला. सध्या या तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या राड्यानंतर झालेल्या दगडफेकीच्या घटनेतील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. एका आरोपीकडे पोलिसांकडून गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुस आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

बदनामीची धमकी देत माजी सैनिकाकडून पावणेचार लाख रुपये उकळले

चंद्रशेखर राव म्हणतात, जिंकलो तर मुस्लिम तरुणांसाठी खास आयटी पार्क उभारणार!

‘पंतप्रधान मोदी यांनी धीर दिल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला’

विजयपत सिंघानियांची उद्विग्नता; गौतम सिंघानिया रेमंडला उद्ध्वस्त करतोय!

मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नाही

दुसरीकडे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नसल्याचं माहिती अधिकारातून समोर आलं आहे. जालन्याचे पोलीस उपाधीक्षक आर सी शेख यांनी ही माहिती दिली आहे. जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले होते असा विरोधकांनी प्रश्न केला होता. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली आणि तसा आदेश गृहमंत्रालयाकडून दिला गेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. तरीही जालन्यातील घटनेवरून विरोधकांनी फडणवीसांवर आरोप केले होते.

Exit mobile version