23.6 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामाइंस्टाग्रामवरील प्रेम प्रकरणातून घडला 'लव्ह जिहाद', मुलीची हत्या

इंस्टाग्रामवरील प्रेम प्रकरणातून घडला ‘लव्ह जिहाद’, मुलीची हत्या

Google News Follow

Related

राजस्थानमध्ये एक लव्ह जिहादचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. इंस्टाग्रामवर मैत्री झाल्यांनतर त्यांचे प्रेम प्रकरण सुरु झाले काही काळाने पीडित मुलीने त्या व्यक्तीपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सूडाच्या भावनेतून त्या मुलाने तिची हत्या केली आहे.

राजस्थानमध्ये या आठवड्याच्या सुरवातीला ही घटन घडली होती. पीडित मुलगी स्वाती ही सतरा वर्षाची असून हिंदू आहे आणि आरोपी अर्शद मुस्लिम आहे. २२ मार्चच्या दुपारी स्वाती ही तिच्या घरातून बाहेर पडली. बराच काळ उलटल्यानंतर ती घरी आली नाही तेव्हा तिच्या आईला थोडा संशय आला. जेव्हा स्वातीचा चुलत भाऊ कमल घरी आला तेव्हा घडलेला प्रकार तिच्या आईने सांगितला. कमलने स्वातीच्या फोनची तपासणी केली असता, त्याला स्वाती आणि अर्शद यांच्यातील संशयास्पद संवाद मिळाला.

कमलने तात्काळ स्थानिकांच्या मदतीने स्वातीचा परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला. संध्याकाळच्या सुमारास त्यांना स्वातीचा मृतदेह रासमांगळ्यावजा महामार्गालगतच्या जंगलात आढळून आला. स्वातीवर बलात्कार करून तिचा गळा चिरून हत्या करण्यात आली होती.

कमलने या प्रकारांची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. तक्रारीत कमलने, या प्रकरणाचा लव्ह जिहाद असा उल्लेख केला आहे आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपींवर आयपीसी कलम ३६६ (अपहरण), ३७६डी (सामूहिक बलात्कार) आणि ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,” स्थानिकांनी मुख्य आरोपीला स्वातीच्या मृतदेहाजवळ बसलेले पाहिले, त्याच्या हातात चाकू होता. तो स्वत:वर वार करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याला अजमेर रेल्वे स्थानकाजवळ पकडले. अर्शदशिवाय अन्य तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, तर आणखी दोन संशयितांचा शोध सुरू आहे. तपास सुरू असल्याचे सांगत पोलिसांनी अन्य संशयितांची नावे उघड केली नाहीत. मुख्य आरोपीचे नाव मोहम्मद अर्शद असे आहे, जो उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील मल्लावान ब्लॉकमधील सराय सुलतान गावचा रहिवासी आहे.”

अर्शदने इंस्टग्रामवर स्वातीशी मैत्री केली होती. पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही दिवसांनी स्वातीने अर्शदला टाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आक्रमक होऊन अर्शद तिला धमकी देऊ लागला. जर तिने दुर्लक्ष केले तर मी आत्महत्या करेन अशी धमकी त्याने स्वातीला दिली. स्वातीवर अर्शद भेटण्याचा दबाव टाकू लागला आणि जर भेटण्यास नाही आली तर तो तिच्या घरी जाईल अशी धमकी त्याने स्वातीला दिली. त्यावरून २२ मार्चला स्वाती त्याला भेटण्यास गेली असता हा सर्व प्रकार घडला.

हे ही वाचा:

पुढील वर्षीपासून महिला आयपीएल स्पर्धेचा थरार रंगणार

‘राजकारण गेलं चुलीत, फक्त महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे’

मध्य रेल्वेला कमाईत मिळाले अव्वल स्थान!

ठाकरे सरकारने माझ्या हत्येचा कट रचलाय

ही घटना परिसरात पसरल्यानंतर अनेक सामाजिक संघटनांनी स्वातीचा मृतदेह ताब्यात घेतलेल्या रुग्णालयासमोर निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी कुटुंबासाठी ५० लाख रुपयांची भरपाई आणि खटल्याचा जलदगती खटला चालवण्याची मागणी केली आहे. स्थानिकांनी पोलिस आणि प्रशासनाविरोधात मोर्चा काढून बाजारपेठा दिवसभर बंद ठेवण्यास भाग पाडले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा