30 C
Mumbai
Saturday, October 5, 2024
घरक्राईमनामालिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारिक केले

लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारिक केले

मीरा रोड परिसरात थरकाप उडवणारी घटना उघडकीस

Google News Follow

Related

मुंबईतील मीरा रोडमध्ये लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या लिव्ह-इन पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन विल्हेवाट लावण्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेले सर्व साहित्य पोलीसांनी जप्त केले आहे. मनोज साने (५६ वर्ष) असे आरोपीचे नाव असून सरस्वती वैद्य (३२ वर्षे) असं मृत महिलेचे नाव आहे.

मीरा- भाईंदर येथे उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाशदीप नावाच्या सोसायटीमध्ये मनोज आणि सरस्वती मागच्या तीन वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहायचे. त्याच इमारतीत राहणाऱ्या शेजारच्या लोकांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी नयानगर पोलीस ठाण्यात माहिती देऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच ही घटना उघडकीस आली.

माहितीनुसार, मृतदेहाचे तुकडे करून आरोपी ते तुकडे कुकरमध्ये टाकायचा, ते उकळायचा त्यानंतर मग मिक्सरमध्ये बारीक करायचा. हे तुकडे पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या गटारात फेकून द्यायचा. यासाठी तो त्याच्या बाईकचा वापर करत असे. दरम्यान, गुन्ह्यासाठी वापरलेलं सगळं सामान आणि बाईक पोलिसांनी जप्त केले आहे.

हे ही वाचा:

दूरदर्शनवरील प्रसिद्ध वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचे निधन

इंदिरा गांधी यांची हत्येचे चित्रण कॅनडातील चित्ररथावर

शतकवीर हेड आणि स्मिथची अडीचशे धावांची भागीदारी

पंतप्रधान मोदींनी शिक्षण घेतलेली शाळा बनणार ‘प्रेरणा स्थळ’

यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर केला. त्यानंतर लिव्ह इन पार्टनरचे तुकडे केले. कटर मशीनच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. ही हत्या का करण्यात आली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, महिलेचा खून दोन ते तीन दिवसांपूर्वी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचे गुन्हे देखील त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा