न्यायालयातील सुनावणीदरम्यान न्यायाधीशांना योग्य प्रकारे सॅल्युट न केल्याने सहायक पोलिस आयुक्तांवर कारवाई करावी, असे आदेश गुरुग्रामच्या एका न्यायालयाने पोलिस आयुक्तांना दिले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी पोलिस उपायुक्त करण गोयल यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
सहायक पोलिस आयुक्त नवीन शर्मा आणि त्यांच्या पथकाने फसवणुकीच्या प्रकरणातील एका आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सादर केले होते. न्यायालयाने या प्रकरणी आदेश दिल्यानंतर या खटल्यातील तपास अधिकारी नवीन याने केवळ स्वतःचा हात उचलून आणि दोन बोटे कपाळावर ठेवून अयोग्य प्रकारे खंडपीठाला सॅल्युट केले.
जेव्हा न्यायाधीशांनी या सॅल्युटबाबत त्यांना विचारले तेव्हा त्यांनी आपल्याला अशाच प्रकारे सॅल्युट शिकवले आहे. पहिल्यांदा हात उचलणे, त्यानंतर तो डोक्यावर ठेवणे आणि योग्य प्रकारे सॅल्युट करणे असे असल्याची सारवासारव या सहायक पोलिस आयुक्ताने केली. त्यानंतर या पोलिसाने मी घट्ट पेहराव परिधान केल्यामुळे न्यायाधीशांना ते सहजपणे सॅल्युट करू शकले नाहीत, असे कारण त्यांनी सांगितले. मात्र न्यायालयाला हे उत्तर पटले नाही.
हे ही वाचा:
हिंसाचार करणाऱ्या शेतकऱ्यांचे पासपोर्ट, व्हिसा रद्द करणार
ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचे बीसीसीआयचे वार्षिक कंत्राट रद्द
तृणमूलचा नेता शेख शहाजहान याला अखेर अटक
जामतारामध्ये भीषण अपघात; १२ प्रवाशांना रेल्वेने चिरडले
सहायक पोलिस आयुक्तांचे हे वर्तन प्रोटोकॉल आणि नियमांविरुद्ध असल्याचे मात्र न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर न्यायालयाने या सहायक पोलिस आयुक्तांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश पोलिस आयुक्तांना दिले आहेत. या प्रकरणी एका आठवड्याच्या आत अहवाल सादर करण्याचेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.