‘न्यूज क्लिक’ प्रकरणी एचआर विभागाचे प्रमुख सरकारी साक्षीदार होण्यास तयार

‘न्यूज क्लिक’ वृत्तसंस्थेवर चीन समर्थनार्थ प्रोपेगेंडा चालवण्यासाठी पैसे मिळाल्याचा आरोप

‘न्यूज क्लिक’ प्रकरणी एचआर विभागाचे प्रमुख सरकारी साक्षीदार होण्यास तयार

‘न्यूज क्लिक’ या वृत्तसंस्थेवर चिनी फंडिंगचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली होती. ‘न्यूज क्लिक’चे एचआर विभागाचे प्रमुख अमित चक्रवर्ती यांनी सरकारी साक्षीदार होण्यासाठी दिल्ली न्यायालयात धाव घेतली आहे. ‘न्यूजक्लिक’ या वेब पोर्टलला सन २०१८ ते २०२१ दरम्यान नेविल रॉय सिंघम या अमेरिकास्थित उद्योजकाशी संबंधित विविध संस्थांकडून २९ कोटी २९ लाख रुपये मिळाल्याचे आढळून आले होते. ‘न्यूजक्लिक’ या पोर्टलला मिळालेल्या विदेशी निधीच्या बाबतीत ईडीने अमेरिकन उद्योजक नेव्हिल रॉय सिंघम याला समन्स देखील जारी केले होते.

‘न्यूज क्लिक’ या वृत्तसंस्थेवर चीन समर्थनार्थ प्रोपेगेंडा चालवण्यासाठी पैसे मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी न्यूजक्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि चक्रवर्ती यांच्यावर यूएपीए अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ‘न्यूज क्लिक’चे एचआर विभागाचे प्रमुख अमित चक्रवर्ती यांनी दिल्ली न्यायालयात अर्ज दाखल केला असून याप्रकरणी सरकारी साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याप्रकरणी माफी मिळावी आणि माझ्याकडे यासंबंधी महत्त्वाची माहिती असून ती आपण दिल्ली पोलिसांना सांगण्यास तयार असल्याचे चक्रवर्ती अर्जामध्ये म्हणाले आहेत. त्यानंतर न्यायालयाने दंडाधिकारी न्यायालयाला चक्रवर्ती यांची साक्ष नोंदवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ऑक्टोबर महिन्यात दिल्ली पोलिसांनी चक्रवर्ती आणि प्रबीर पुरकायस्थ यांच्यासह अनेक पत्रकारांच्या घरावर छापेमारी केली होती. न्यूज क्लिकला कोणाकडून निधी मिळाला याबाबत सक्तवसुली संचालनालयाने तपास केला होता. केंद्रीय यंत्रणाच्या इनपुटनुसार दिल्ली पोलिसांनी तपास सुरु केला होता. ऑगस्ट महिन्यामध्ये न्यूयॉर्क टाईम्सने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार, न्यूज क्लिकला अमेरिकेन अब्जाधीश नेविल्ले रॉय सिंघम यांच्याकडून ३८ कोटी मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. सिंघम यांचा कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या प्रोपेगेंडा कंपनीसोबत जवळचे संबंध असल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा:

चुनाभट्टीत गुंड येरुणकरचा गेम करणारे चार हल्लेखोर अटकेत

चोर घोड्यावरून आले, पण कुत्र्यांनी पळवून लावले!

अटल.. अचल.. अविचल.. अटल बिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान, गृहमंत्र्यांकडून आदरांजली

जयपूर; १४ वर्षीय शाळकरी मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!

प्रकरण नेमकं काय?

‘न्यू यॉर्क टाईम्स’मधील एका रिपोर्टमध्ये नेव्हिल रॉय सिंघम याने ‘न्यूज क्लिक’या संस्थेला आर्थिक मदत केली. तसेच त्याचा संबंध चिनी कम्युनिस्ट पक्षाशी असल्याचा आरोप केला आहे. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, नेव्हिल रॉय सिंघमच्या नेटवर्कनं चुकीच्या माहितीला प्रोत्साहन दिलं आणि चीन समर्थक संदेशांचा प्रचार करून मुख्य प्रवाहातील काही प्रकरणांवर प्रभाव टाकला.

Exit mobile version