27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामापुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची दहशतवादी संघटना लश्करचा हात

पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची दहशतवादी संघटना लश्करचा हात

तीन ते चार दहशतवाद्यांनी नेला कट तडीस

Google News Follow

Related

सूरनकोट परिसरात शनिवारी हवाई दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानची दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैबाचा हात असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात तीन ते चार दहशतवाद्यांचा सहभाग होता, असे समजते.
या हल्ल्याचा सूत्रधार अबू हमजा असल्याचे सांगितले जात आहे. सीमावर्ती जिल्ह्यातील राजोरी-पुंछमध्ये दहशतवादी कारवायांमागे अबू हमजाचा हात आहे. हल्ल्यात अधिक मनुष्यहानी व्हावी, यासाठी स्टील बुलेटचा वापर करण्यात आल्याचेही समोर आले आहे. मात्र अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

दहशतवाद्यांचा शोध दुसऱ्या दिवशी रविवारीही सुरू होता. सुरक्षा अधिकारी २० किमीचा परिसर पिंजून काढत आहेत. या शोधमोहिमेत हेलिकॉप्टर, ड्रोन, श्वानपथक व पॅराकमांडोंची मदत घेतली जात आहे. या दरम्यान संशयित म्हणून चौकशी करण्यासाठी सहाहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, दहशतवाद्यांनी जास्तीत जास्त मनुष्यहानी करण्यासाठी एके असॉल्ट रायफलींसह अमेरिकी बनावटीच्या एम ४ कार्बाइन आणि स्टीलच्या गोळ्यांचाही वापर केला. हल्ल्यानंतर हल्लेखोर जंगलात लपले आहेत. जम्मूचे केआईजीपी आनंद जैन, लष्कर आणि गुप्तचर संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शाहसितार, गुरसाई, सनाई और शीनदारा टॉप सह अनेक ठिकाणी लष्कर आणि पोलिसांची संयुक्त मोहीम सुरू आहे. सीमावर्ती पुंछ जिल्ह्यासह जवळच्या राजोरी जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत मोठे दहशतवादी हल्ले झाले. या भागात सन २००३ ते २०२१ या कालावधीत दहशतवाद जवळपास संपला होता.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदी यांचा अर्ज भरताना राष्ट्रपती उपस्थित असल्याचे खोटे ट्वीट

विजय वडेट्टीवार यांचा निवडणूक प्रचार करण्याचा अधिकार काढून घ्यावा!

गुजरातमधून अटक केलेला मौलवी ओवेसीचा अनुयायी, इंडोनेशिया-कझाकस्तानमधील कट्टरपंथीयांच्या संपर्कात

मध्य प्रदेशात काँग्रेसला आणखी एक धक्का, आमदार निर्मला सप्रे यांचा भाजपात प्रवेश!

हवाई दल प्रमुखांकडून मानवंदना

हवाई दलाने हुतात्मा कॉर्पोरल विक्की पहाडे याच्या कुटुंबीयाप्रती सांत्वन व्यक्त केले. हवाई दल प्रमुख एअरचीफ मार्शल व्ही आर चौधरी आणि भारतीय हवाई दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी बहाद्दूर कॉर्पोरलच्या सर्वोच्च बलिदानाला मानवंदना दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा