तब्बल चार कोटींचे आयफोन लंपास!

हॉलिवूड चित्रपटाप्रमाणे धाडसी दरोडा

तब्बल चार कोटींचे आयफोन लंपास!

मनी हाईस्ट सीरीजसारखी धाडसी चोरी अ‍ॅपल स्टोअरमध्ये घडल्याची माहिती समोर येत आहे. चोरांनी अ‍ॅपल स्टोअरमध्ये प्रवेश केला आणि ४ कोटी १० लाख रुपये किमतीचे ४३६ आयफोन घेऊन पळ काढला.एरिक मार्क्स, प्रादेशिक व्यवस्थापक यांनी सांगितले की, घटनेनंतर सकाळी त्यांना एक कॉल आला पण नेमकं काय सांगावं हे त्यांना कळत नव्हते.स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, चोरांनी सिएटल कॉफी गियरमध्ये प्रवेश केला आणि ऍपल स्टोअरच्या बॅकरूममध्ये प्रवेश मिळविण्यासाठी बाथरूमच्या भिंतीला छिद्र पाडले.

चोरट्यांनी शेजारच्या कॉफी शॉपचा वापर करून अ‍ॅपल स्टोअरच्या सुरक्षा यंत्रणेला चकवा देत सुमारे ५,००,००० डॉलर्स किमतीचे ४ कोटी १० लाख रुपये किमतीचे ४३६ आयफोन चोरले.कॉफी शॉपचे सीईओ- माईक ऍटकिन्सन यांनीही ट्विटरवर अ‍ॅपल स्टोअरच्या बाथरूममध्ये चोरट्यांनी तयार केलेल्या भगदाडाच्या फोटोसह याबद्दल माहिती दिली आहे. पोलिसांनी पुष्टी केली की अ‍ॅपल स्टोअरमध्ये प्रवेश करण्यासाठी ज्या कॉफी शॉपचा वापर केला गेला होता त्यांनीच फोन करून याबाबत माहिती दिली होती.

दरम्यान यानंतर, सिएटल कॉफी गियरला त्यांचे कुलूप बदलण्यासाठी जवळपास ९०० डॉलर खर्च करावे लागले तर बाथरूमच्या दुरुस्तीवर ६०० ते ८०० डॉलर्स खर्च अपेक्षित आहे. पोलिस या गुन्ह्याचा तपास करत आहेत.सिएटलच्या किंग ५ न्यूजच्या मते, गुन्ह्याचा वेग आणि अचूकतेमुळे काही लोकांचा संशय आहे की, हे ओळखीच्याच माणसाचे काम आहे.स्टोअरमध्ये डिस्प्लेसाठी लावण्यात आलेले मोबाईल चोरण्यात फारशी मेहनत लागत नाही आणि या आयफोनची किंमत ही सोन्या-हिऱ्यां इतकीच महाग आहे, त्यामुळे चोर अ‍ॅपल स्टोअरला अनेकदा टार्गेट करतात.

हे ही वाचा:

अदानीविरोधकांना हादरा, गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट

महाराष्ट्र का म्हणतोय, बरे झाले ठाकरे गेले???

राहुल गांधी यांना धक्का, मानहानीबद्दल झालेली शिक्षा कायम

आर्थिक मदतीसाठी येमेनमध्ये झाली तुफान चेंगराचेंगरी; ८० पेक्षा जास्त लोक ठा

आतापर्यंत अ‍ॅपलने चोरीबद्दल कोणतेही विधान केलेले नाही. दुसरीकडे अ‍ॅपल चे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी भारतात दोन अ‍ॅपल रिटेल स्टोअरचे उद्घाटन केले आहे. पहिले स्टोअर १८ एप्रिल रोजी मुंबई बीकेसी मध्ये उघडण्यात आले, तर दुसऱ्या स्टोअरचे अनावरण २० एप्रिल रोजी दिल्लीतील साकेत येथील सिलेक्ट सिटी वॉक मॉलमध्ये करण्यात आले. भारताच्या दौऱ्यावर असलेल्या टिम कुक यांनी बुधवारी नवी दिल्लीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली.

Exit mobile version