राजधानी दिल्लीतील छावला भागातील कालव्यात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली आसिफ नावाच्या मुलाला अटक केली आहे. मृत मुलीचे नाव कोमल असे असून ती सीमापुरी पोलिस स्टेशन परिसरातील सुंदर नगरी येथील रहिवासी आहे. तरुणीची गळा दाबून हत्या करण्यात आली आणि तिचा मृतदेह दगडाला बांधून छावला कालव्यात फेकून देण्यात आला होता.
पोलिस तपासात असे दिसून आले की, ही तरुणी १२ मार्चपासून घरातून बेपत्ता होती आणि त्याच दिवशी आसिफ नावाच्या ओळखीच्या व्यक्तीने तिची हत्या केली. पोलिस तपासात असे दिसून आले की आसिफ हा टॅक्सी ड्रायव्हर आहे आणि त्याची तरुणीसोबत जुनी ओळख आहे. १२ मार्च रोजी त्याने सीमापुरी परिसरातून तरुणीला त्याच्या गाडीतून उचलले आणि त्यांच्यात कशावरून तरी वाद झाला, त्यानंतर आसिफने कोमलचा गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह कालव्यात फेकून दिला.
हे ही वाचा :
‘छावा’च्या ठिणगीने वणवा पेटलाय !
दिशा सालियन हत्या प्रकरण आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या अंगाशी येणार?
नागपूर हिंसाचार: विहिंप आणि बजरंग दलाच्या आठ कार्यकर्त्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण!
१७ मार्च रोजी मृतदेह फुगून पाण्यावर तरंगू लागला. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. द्वारका जिल्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत छावला पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला. कोमलच्या अपहरणाचा गुन्हा सीमापुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. दरम्यान, सध्या पोलिसांनी आरोपी आसिफला अटक केली आहे आणि गुन्ह्यात वापरलेली कार देखील जप्त करण्यात आली आहे. आरोपी आसिफसोबत आणखी कोण होते याची पडताळणी केली जात आहे.