लग्नमंडपातून फरफटत आणत, मुलीला फासावर लटकवले

वडील आणि काकाने सरण रचत तिचा मृतदेह जाळला.

लग्नमंडपातून फरफटत आणत, मुलीला फासावर लटकवले

जालना जिल्ह्यातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. गावात एका मंदिरात मुलीच्या लग्नाची तयारी सुरु होती. मात्र, लग्नापूर्वी अर्धा एकर जमीन मुलीच्या नावे करण्याची मागणी मुलीच्या वडिलांनी केली. मात्र त्याला नकार मिळाला. त्यामुळे संतापलेल्या वडील आणि तिच्या काकांनी मुलीला मंडपातून ओढत घरी आणले. प्रेम विवाह असल्याने बदनामीच्या भीतीने दोघांनी मुलीच्या गळ्याला दोर बांधून घराजवळच्या झाडावर लटकवले. पुढे वडील आणि काकाने सरण रचत तिचा मृतदेह जाळला.

ही घृणास्पद घटना जालना जिल्ह्यातील पीर पिंपळगाव येथून उघडकीस आली आहे. सूर्यकला संतोष सरोदे असं या मयत मुलीचं नाव असून, ती ११ वी मध्ये शिकत होती. सूर्यकला ही संतोष सरोदे याची मुलगी. चुलत आत्याच्या मुलाचे व तिचे प्रेम जुळले होते. त्यामुळे दोघेही घरातून निघून गेले होते. परंतु घरच्यांनी त्यांना लग्न लावून देतो, असं सांगून पुन्हा घरी बोलवले. त्याप्रमाणे त्यांच्या लग्नाची तयारी झाली आणि दोन्ही कुटुंब लग्नासाठी मंदिरात जमली. परंतु मुलीचा काका नामदेव सरोदे याने वरच्या कुटुंबाकडे मुलीच्या नावावर अर्धा एकर जमीन नावावर करण्याची मागणी केली. त्या मागणीला नकार मिळाल्याने वडिलांसह काकाने मुलीला ओढत घरी आणले.

बदनामीच्या विचाराने घरच्या समोरच असलेल्या लिंबाच्या झाडाला मुलीला लटकावून फाशी दिली. एवढ्यावरच न थांबता दोघांनी घराजवळचं सरण रचून मृतदेहाला अग्नी दिली आहे. तसेच दोन गोण्यांमध्ये मुलीची राख भरून ठेवली. ही घटना उघडकीस आल्यावर लोकमत वृत्तवाहिनीने त्या ठिकाणची पाहणी केली. ज्या ठिकाणी मृतदेह जाळला होता त्या जागेवर रांगोळी काढण्यात आली होती.

हे ही वाचा : 

नेमाडपंथी पुरोगामी अज्ञानपीठ

उद्या मुंबईमध्ये भाजपाचा ‘माफी मांगो’ मोर्चा

ठाकरे गटाला नाशिकमध्ये खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात

अखेर कोळी बांधवांची मागणी मुख्यमंत्र्यांनीचं पूर्ण केली

या घटनेनंतर सरोदे यांच्या घरात शांतात होती. गावातील काही मंडळी भेटण्यासाठी येत होती. घटनेच्या वेळी घरातील काही मंडळी हजर होती. परंतु कोणीही तिला वाचविण्याचा प्रयत्न का केला नाही? असा सवाल आता उपस्थित केला जातं आहे. याप्रकरणी संतोष सरोदे व नामदेव सरोदे या दोघांनाही गुरुवारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version