लिंबगाव पिंपरी महिपाळ गावात पोटच्या मुलीचीच प्रेमप्रकरणामुळे गावात आपली नाचक्की होईल, या भितीने तिच्याच घरच्यांनी तिची हत्या केली आहे. कोणालाही संशय येऊ नये म्हणून स्वतःच्याच शेतात तिचा मृतदेह जाळून त्या मृतदेहाची राख गोदावरी नदीच्या खोऱ्यात टाकली आहे. २३ वर्षीय शुभांगी जोगदंडचं तिच्या एका गावातल्याच मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. सध्या ती ‘बीएचएमएस’ च्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. पण घरच्यांनी म्हणजेच तिचे आई , वडील, दोन भाऊ आणि मामा यांनी मिळून तिचा गळा आवळून खून केला. संशयाच्या कारणावरून आपल्या शेतात तो मृतदेह जाळून त्याची राख नदीत टाकली. चार दिवस हे कोणालाच कळले नाही पण एका फोनमुळे हा खून उघडकीस आला.
निनावी फोनने उघडले खुनाचे बिंग
२६ जानेवारी गुरुवारी एका व्यक्तीने पोलिसांना शुभांगीची हत्या करून तिला जाळल्याची माहिती दिली. त्याआधी सोमवारपासून शुभांगी नजरेस न पडल्याने शेजारी कुजबुज सुरु झाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपास केला असता तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी शुभांगीचे वडील, भाऊ , चुलत भाऊ , मामा इत्यादींना अटक केली तेव्हा त्यांच्या जबाबातून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. कलम ३०२, २०१, १२० अंतर्गत लिमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाने अवघ्या नांदेड जिल्ह्यात खळबळ माजली आहे. मुलीच्या मारेकऱ्यांना कठोरात-कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी आता करण्यात येत आहे.
हे ही वाचा:
इंडिया टुडे सीव्होटरच्या सर्वेक्षणात मोदी सर्वोत्तम; लोकसभेसाठी महाराष्ट्रात मविआला थेट ३४ जागा
अदाणींचा गेम कोण करतोय? कही पे निगाहे, कही पे निशाना…
सुरक्षा नसल्याचे कारण देत बनिहालमध्ये भारत जोडो यात्रा थांबवली
पंतप्रधानांनी परीक्षांसंदर्भात मुलांशी सुसंवाद साधला ही अभिमानाची गोष्ट!
हत्येचं कारण काय?
शुभांगी हि बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. गावातील एका तरुणावर तिचे प्रेम होते.पण शुभांगीच्या कुटुंबीयांनी ते मान्य नसल्यामुळे . कुटुंबीयांनी तीन महिन्यांपूर्वी शुभांगीचं लग्न जुळवून तिचा साखरपुडा उरकला होता, मात्र आठ दिवसांपूर्वी शुभांगीच्या या प्रेमसंबंधांबाबत मुलाकडच्यांना माहिती मिळाल्याने तिचं जमलेले लग्न मोडले होते. सोयरिक मोडल्याने गावात आपले नाव बदनाम होण्याच्या रागातून रविवारी २२ जानेवारी ला आई-वडिलांनी शुभांगीच्या मामा आणि तिच्या दोन भावांच्या साथीने तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह स्वतःच्या शेतात नेऊन जाळूनही टाकला. तसंच कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी या सर्वांना शुभांगीच्या मृतदेहाची राख ही जवळच असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात फेकून दिली. पोलिसांना निनावी फोने गेल्याने हे प्रकरण उघड किस आले.