१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील त्या चार आरोपींना सीबीआयने घेतलं ताब्यात

१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील त्या चार आरोपींना सीबीआयने घेतलं ताब्यात

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी चार फरार आरोपींना गुजरात एटीएसने अटक केली होती. या चारही आरोपींना आता सीबीआयने ताब्यात घेतले असून चारही जणांना सीबीआय कोठडीत पाठवण्यात आले आहे.

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सीबीआयने चार जणांना ताब्यात घेतले आहे. युसुफ भटाका, शोएब बाबा, सैय्यद कुरेशी आणि अबू बकर अशी या चार आरोपींची नावे आहेत. या चौघांना गुजरात एटीएसने गेल्या आठवड्यात अटक केली होती. केंद्रीय यंत्रणेने या चार जणांना मुंबईतून ताब्यात घेतले असून त्यांना सात दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवण्यात आले आहे.

१९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यावर हे सर्व आरोपी परदेशात पळून गेले होते. त्यानंतर हे आरोपी बनावट पासपोर्टच्या आधारे अहमदाबादमध्ये आले आणि या संदर्भात गुजरात एटीएसला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही मोठी कारवाई करण्यात आली.

हे ही वाचा:

हे सरकार पाण्याचा शत्रू

इंग्लंडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांपुढे सोनिया गांधीनी पसरला पदर

जपानी मुलाचं हिंदी ऐकून पंतप्रधान मोदी म्हणाले…

मशिदींतून काढलेले भोंगे शाळा, रुग्णालयांना दान

दरम्यान, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे लक्ष्य सध्या राजकीय नेते असल्याची माहिती एनआयएने दिली होती. काही आठवड्यांपूर्वी एनआयएने मुंबई आणि उपनगरांत २७ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. तर काहींची चौकशी देखील करण्यात आली होती.

Exit mobile version