सॅटिस पुलाखालची अग्निरोधक यंत्रणा वायूवेगाने पळवली

सॅटिस पुलाखालची अग्निरोधक यंत्रणा वायूवेगाने पळवली

Burning Flames and Fire Extinguishers

ठाणे स्थानक परिसरातील सॅटिस पुलाखाली महापालिकेने अग्निरोधक यंत्रणा बसवली होती. मात्र ही अग्निरोधक यंत्रणाच गायब झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. सॅटिस पुलाची उंची कमी असल्यामुळे या परिसरात आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहचणे अवघड जाते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरती सोय असावी म्हणून अग्निरोधक सिलिंडर ठेवण्यात आले होते. ही यंत्रणा चोरी झाल्याचा संशय असून महापालिकेच्या अग्निशमन दलाला याची कल्पनाच नाही.

ठाणे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ठाणे महापालिकेने सॅटिसची बांधणी केली आहे. पुलाची उंची कमी असल्यामुळे आग लागल्यास त्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचणे अवघड आहे. काही वर्षांपूर्वी ठाणे स्थानकाच्या या परिसरात एका दुकानाला आग लागली होती, तेव्हा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचू शकल्या नव्हत्या. त्यावेळी तात्पुरती सोय असावी म्हणून पालिकेकडून अग्निरोधक सिलिंडर बसवण्यात आले होते.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांच्या सहाय्यकांवर ईडीचे आरोपपत्र

शिवसेनेची तंतरली…‘त्या’ वक्तव्यावरून राणे यांना अटक करण्याचे आदेश

‘खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर समोर येऊन दोन हात करा’

नाशिक मध्ये भाजपा कार्यालयावर दगडफेक

गेल्या काही दिवसांपासून यातील दोन सिलिंडर गायब झाले असून दोन सिलिंडरची नूतनीकरणाची तारीख दोन वर्षांपूर्वी उलटून गेल्याची बाब समोर आली आहे. अग्निरोधक सिलिंडरच्या रिकाम्या पेट्यांमध्ये सध्या फेरीवाल्यांच्या ताडपत्री आणि इतर साहित्य ठेवलेले दिसून येते. ठाणे स्थानक परिसरात अनेक खाद्यपदार्थांची दुकाने असून तिथे गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. तसेच अनेक सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा पुलाखाली उभ्या असतात. सॅटिस पुलाखाली अनेक विजेच्या तारा लोंबकळत असतात. अनेक वाहने, प्रवासी या पुलाखालून ये- जा करत असतात. त्यामुळे एखाद्या ठिणगीनेही मोठी आग लागू शकते, अशी भीती गणेश घुडे या प्रवाशाने केली आहे. अग्निरोधक यंत्रणा नसेल तर आमचे अधिकारी स्थानक परिसरात जाऊन पाहणी करतील, अशी माहिती ठाणे महापालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी गिरीश झळके यांनी दिली.

Exit mobile version