पुणे दहशतवादी प्रकरणातील पाचवा आरोपी देत होता बॉम्बस्फोट घडवण्याचे प्रशिक्षण

दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवत होता

पुणे दहशतवादी प्रकरणातील पाचवा आरोपी देत होता बॉम्बस्फोट घडवण्याचे प्रशिक्षण

पुण्यातून अटक केलेल्या दहशतवाद्यांचा प्रकरणातून तपासादरम्यान अधिक धक्कदायक बातमी समोर येत आहे. राज्य दहशतवादीविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवार, १ ऑगस्ट रोजी झुल्फिकार बडोदावाला याला अटक केली होती. आता ११ ऑगस्टपर्यंत त्याला एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, झुल्फिकार हा अनेकांना बॉम्बस्फोट घडवण्याचे प्रशिक्षण देत होता, अशी माहिती समोर आली आहे.

झुल्फिकार बडोदावाला हा पुण्यातील दिवेघाटात बॉम्बस्फोट घडवण्याचे प्रशिक्षण देत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोथरूडमधून अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून झुल्फिकार याला अटक करण्यात आली होती. झुल्फिकार हा दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवत होता. आत्तापर्यंत या गुन्ह्यात पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

बडोदावाला याने महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान आणि महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी या दोन दहशतवाद्यांना दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवले आहेत. त्याने या दोघांशी वेळोवेळी फोनवरून संपर्क देखील साधला आहे, हे उघड झाले आहे.

हे ही वाचा:

अंदमान बेटांवर बसले भूकंपाचे धक्के

चित्त्यांबाबत चिंता वाटणारे पत्र आपण लिहिलेच नाही! तज्ज्ञांचे स्पष्टीकरण

पुण्यातून पावणेदोन कोटी रुपये किंमतीचे अफीम जप्त

चेतन सिंहच्या मानसिक विकाराच्या दाव्यावर पोलिसांना संशय

पुणे पोलिसांनी १८ जुलै रोजी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान (वय २३) आणि महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी (वय २४) या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. मध्यप्रदेशच्या रतलाममधील मूळ रहिवासी असलेले हे दोघे जयपूर बॉम्बस्फोट कटातील फरार आरोपी आहेत. ‘एटीएस’ने यापूर्वी या दहशतवाद्यांच्या कोंढव्यातील घरातून ड्रोन, संवेदनशील स्थळांची छायाचित्रे आणि लॅपटॉमधून पाचशे जीबी डेटा हस्तगत केला होता. त्यानंतर ‘एटीएस’ने तपासादरम्यान दोन दहशतवाद्यांकडून बॉम्ब तयार करण्याचे रसायन आणि प्रयोगशाळेतील उपकरणे जप्त केली आहेत. शिवाय त्यांच्या घराच्या पंख्यामध्ये बॉम्ब कसा बनवायचा याची चिठ्ठी सापडली.

Exit mobile version