मुंबईच्या वडाळा परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका ट्रकच्या मागे एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला आहे. या महिलेचे वय साधारणपणे ३० ते ४० च्या दरम्यान असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्ट (BPT) येथील गस्ती पथकाला एक संशयास्पद पिशवी सापडली होती. ही पिशवी उघडली असता त्यामध्ये एक जळालेला मृतदेह होता. या महिलेचे तीन तुकडे करण्यात आले होते. त्यापैकी डोकं धड आणि एक पाय पोलिसांना सापडला आहे. सध्या मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ट्रॅक पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांना वडाळा परिसरात एक मृतदेह दिसला. त्यानंतर वडाळा पोलीस ठाण्यात ही माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे.
Mumbai: We have recovered the half-burnt body of an unidentified woman from the Wadala area. Our patrolling team at Mumbai Port Trust had found a suspicious bag that contained a burned body. We sent the body for postmortem. Case of murder registered against an unknown accused and…
— ANI (@ANI) October 27, 2023
हे ही वाचा:
मृत्युदंडाच्या शिक्षेपासून आठ भारतीय वाचू शकतील का?
‘अल जझिराचे युद्धावरील वृत्तांताचे प्रमाण कमी करा’
हमासच्या चुकीचा फटका गाझातील पत्रकाराला बसला; इस्रायलच्या बॉम्बवर्षावात कुटुंब मृत्युमुखी
कतारने ठोठावली भारतीय नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा!
पोलिसांनी महिलेच्या हत्येप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. यासोबतच मुंबई गुन्हे शाखेच्या पथकानेही आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेची हत्या एक ते दोन दिवसांपूर्वी झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. महिलेचा मृतदेह एका पिशवीत होता. संशय आल्याने पिशवीची तपासणी केली असता तो अर्ध जळालेला मृतदेह आढळून आला.