सोनाली फोगट हत्येप्रकरणातील बदनाम ‘कर्लिस बार’ सील

कर्लिस बार सील करण्याचे आदेश गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत

सोनाली फोगट हत्येप्रकरणातील बदनाम ‘कर्लिस बार’ सील

हरियाणाच्या भाजपा नेत्या सोनाली फोगट यांच्या हत्येमुळे वादात आलेला गोव्यातील ‘कर्लिस बार’ सील करण्यात आला आहे. कर्लिस बार सील करण्याचे आदेश गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत.

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाची माहिती मिळवण्यासाठी गोवा पोलिसांनी उपनिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली पाचजणांचे पथक तयार केले आहे. हे पथक आज, ३० ऑगस्ट रोजी सोनाली फोगट यांच्या हरियाणातील हिस्सार गावाकडे रवाना होणार असून, इतर महत्वाच्या ठिकाणांना भेटी देणार आहेत. यासोबतच हे पथक सोनाली यांच्या कुटुंबियांसह इतरांच्या साक्ष आणि जबाब नोंदवणार आहे.

सोनाली फोगट हत्येप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासाचा अहवाल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सादर केला. प्रमोद सावंत यांनी तो अहवाल हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि पोलिस महानिरीक्षकांना पाठवला आहे. या प्रकरणाचा तपास योग्य गतीने आणि पद्धतीने सुरु असून यातील संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. तसेच गरज पडली तरच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले जाईल, असे प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

चित्रदुर्ग मठाच्या पुजाऱ्यावर लैंगिक छळाचे आरोप

वरळी नाक्याच्या बाप्पाचा रथ खेचला मुस्लिम बांधवांनी

निधी देण्यासाठी मिटकरी कमिशन मागतात, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा आरोप

लिंक क्लिक करताच ९७ हजार गमावले

या प्रकरणात आतापर्यंत मुख्‍य संशयित आरोपी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांच्‍यासह ‘कर्लिस बार’चे केअर टेकर एडवीन नुनीस, ड्रग्‍स पुरविणारे पेडरल दत्तप्रसाद गावकर आणि रामदास मांद्रेकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्‍यांची चौकशी सुरू असून मुख्‍य संशयित सोडून इतरांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Exit mobile version