24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाकुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा

कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा

Google News Follow

Related

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलाने एका विद्यार्थिनीवर अनेकदा बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची तक्रार पीडित मुलीने स्वतः पोलिसांत दिली आहे.
कुख्यात गुंड गजानन मारणेचा मुलगा प्रथमेश मारणे याच्यावर बलात्काराचा गुन्हा पीडित मुलीने दाखल केला आहे. हा गुन्हा पीडित मुलीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय ही तरुणी महाविद्यालयात शिकत असून, तिची आणि प्रथमेशची आधीच ओळख होती. एकदा प्रथमेशने तिला खडकवासला परिसरात फिरायला नेले असता एका लॉजवर नेऊन त्याने तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यांनतर पीडित मुलीला २८ ऑगस्ट २०२० ते १७ मार्च २०२२ दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन प्रथमेशने बलात्कार केला आहे.

हे ही वाचा:

तृणमूल नेत्याच्या हत्येनंतर प. बंगालमध्ये १० जणांना जिवंत जाळलं 

‘उ. प्रदेशमधील पराभवासाठी प्रियांका गांधींचा राजीनामा घ्या’

‘राष्ट्रीय महामार्गांवर ६० किलोमीटरच्या अंतरात एकच टोल असेल’

पाटणकर प्रकरणातल्या पुष्पक बुलियनने नोटाबंदीत केली २८५ किलो सोने खरेदी

एवढ्यावरच न थांबता या प्रथमेशने पीडित मुलीला वेगवेगळ्या लॉजवर नेऊन तिचे अश्लिल व्हिडिओसुद्धा तयार केले. हे त्या पीडित मुलीला समजल्यावर तिने त्याला व्हिडीओ डिलीट करायची विनंती केली. मात्र त्याने ऐकले नाही, जेव्हा त्या मुलीने पोलिसांकडे तक्रार करेन असंही धमकावलं. परंतु, पोलिसांकडे तक्रार केल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी प्रथमेशने दिली. पण तरीही हिम्मत करून पीडित मुलीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात येऊन प्रथमेश विरुद्ध तक्रार दाखल केली. पुढील अधिक तपास सिंहगड पोलीस करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा