अनेक विद्यार्थी परीक्षेत वेगवेगळ्या शक्कल लढवून कॉपी करत असतात. अशीच उत्तर प्रदेशमधून एका विद्यार्थिनीची अनोखी कॉपी समोर आली आहे. या मुलीचा हा कॉपीचा प्रकार बघून पर्यवेक्षकही थक्क झाले.
या मुलीने चक्क तिच्या नेलपॉलिशमधून कॉपी केली. तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तर प्रदेशात झाली. ही परीक्षा उत्तर प्रदेशातील नऊ जिल्ह्यांत १५० केंद्रावर घेण्यात आली. तेव्हा परीक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त होता. यामध्ये ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले, त्यांना परीक्षा देण्यापासून रोखण्यात आले. तेव्हा पर्यवेक्षकाला एक विद्यार्थिनी पेपर लिहिताना सारखी तिच्या नखांकडे पाहात होती. काही संशयास्पद वाटले म्हणून पर्यवेक्षकाने तपासले असता हा प्रकार उघडकीस आला.
हे ही वाचा:
ग्यानव्यापी मशिदीत व्हिडीओग्राफीला नकार; न्यायालयाचा अवमान?
जॅकलिन फर्नांडिसच्या संपत्तीवर ईडीची टाच
अमेरिकेतून कुरिअरमधून आणले २७ किलो मारीजुआणा ड्रग्ज; एकाला अटक
MPSC च्या परीक्षेत सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात प्रथम; रुपाली माने मुलींमध्ये पहिली
नखांवर नेलपॉलिश लावल्यासारखे दिसत होते. मात्र जेव्हा जवळून पाहिल्यावर त्या मुलीच्या नखांवर गणिताचे सूत्रे लिहली होती. त्या मुलीने अश्या पद्धतीने काही सूत्रे नखावर लिहली होती की, ते नेलआर्ट केल्यासारखे वाटत होते. त्यावेळी त्या मुलीची तपासणी केल्यांनतर या मुलीने कॉपीसाठी रुमाल, चिट्स आणि स्वतःच्या नखांचा वापर केला होता. तर दुसऱ्या प्रकरणात, त्या मुलीने ब्लुटूथ हेडफोन लावला होता.
या विद्यार्थींवर एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यांना पुढील परीक्षेस बसण्यास मनाई केली आहे, असे प्राध्यापक शिवराज सिंग पुंधीर यांनी सांगितले. हा सर्व प्रकार उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील एका परीक्षा केंद्रावर घडला. या महिन्याच्या सुरुवातीला युपीमध्ये विद्यापीठांच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. मेरठमधील १५० हून अधिक परीक्षा केंद्रावर परीक्षा होती.