एका हॉर्नच्या आवाजावरून चोरीला गेलेल्या आपल्या गाडीची ओळख पटवण्याची किमया एका व्यक्तीने केली आहे. बीडमधील ही अनोखी घटना असून केवळ हॉर्नच्या आवाजाने ही आपलीच गाडी असल्याचे ओळखून या व्यक्तीने चोराला पकडण्यात पोलिसांना यश दिले. बीडमधील माजलगाव शहरात राहणारे कन्हैयालाल ललवाणी यांनी यांची गाडी चोरीला गेली होती. त्यांनी गाडीच्या हॉर्नच्या आवाजावरून या चोरलेल्या गाडीचा शोध लावला.
कन्हैयालाल हे १ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारे राजस्थानी मंगल कार्यालयाबाहेर आपली दुचाकी उभी करून काही कामे करण्यासाठी गेले. आपली कामे संपवून ते दोन वाजता जेव्हा मंगल कार्यालयाच्या बाहेर आले, तेव्हा त्यांना त्यांची गाडी तिकडे नसल्याचे लक्षात आले. गाडी चोरीला गेल्याचा संशय आल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये चोरीच्या संदर्भात तक्रार केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी या दुचाकी चोराचा शोध सुरु केला होता.
अनेकदा वाहनांची चोरी करुन त्याचे पार्ट्स बदलून त्या गाड्या पुन्हा बाजारात विक्री केल्या जातात किंवा वापरल्या जातात. त्यामुळे अनेकदा चोरीला गेलेल्या गाड्या पोलिसांच्या किंवा गाडीमालकांच्या लक्षात येत नाहीत. दरम्यान, कन्हैयालाल यांची दुचाकी चोरट्याने चोरी केलेल्या गाडीतही असेच काही बदल करण्यात आले. गाडीचे काही पार्ट्स बदलून घेतले गेले. गाडीला नवे रूप दिले गेले. गाडीच्या नंबर प्लेटला पांढरा रंग दिला. त्यामुळे ही गाडी चोरीची असल्याची ओळख लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
त्यानंतर, चोरटा ही गाडी घेऊन पुन्हा माजलगाव शहरात फिरु लागला. तर, याचवेळी तो ती गाडी घेऊन कन्हैयालाल लालवाणी यांच्या मुलाच्या जवळून गेला आणि तसेच यावेळी त्याने हॉर्न देखील वाजवला. हॉर्नवरुन कन्हैयालाल लालवाणी यांच्या मुलाला संशय आला. तसेच गाडीचे फायरिंग देखील आपल्याच गाडीची असल्याची त्याची खात्री झाली. त्यामुळे याची माहिती त्याने तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी यावरुन संशयित तरुणाला दुचाकीसह ताब्यात घेतले. पोलिसांनी अधिक कॅगौकाशी केली असता चोरट्याने गाडी चोरीची असल्याची कबुली दिली.
हे ही वाचा:
चांद्रयान- ३ चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत; १७४ किमी x १४३७ किमी अंतराच्या कक्षेत प्रदक्षिणा
सोशल मीडियात हार्दिक पंड्यावर का होतोय हल्ला?
“आय विल किल नरेंद्र मोदी अल्सो” उल्लेख असलेला धमकीचा मेल
राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याचा कोणताही पुरावा नाही
दोन दिवसातच मालकाने हॉर्नच्या आवाजावरुनच आपली दुचाकी ओळखली. त्यामुळे या चोरट्याचं बिंग फुटलं आणि पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणामध्ये आणखी दोन आरोपी सहभागी असल्याचा संशय असून, पोलीस त्यांचा देखील शोध घेत आहेत.